शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

खंडपीठाच्या मागणीला वाढता जोर

By admin | Updated: June 30, 2015 00:35 IST

पुणे शहरामध्ये नागरिकांच्या सोईसाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी दक्षिण पुणे वकील संघटनेने सोमवारी काम बंद आंदोलन केले.

धनकवडी : पुणे शहरामध्ये नागरिकांच्या सोईसाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी दक्षिण पुणे वकील संघटनेने सोमवारी काम बंद आंदोलन केले. सर्व कायदेविषयक कामे बंद ठेवून आंदोलन करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मागणी मंजूर होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.या मागणीसाठी सर्वच वकील संघटनांच्या बरोबरच विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळे, संस्था तसेच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा यासाठी पाठिंंबा मिळत आहे. सोमवारी धनकवडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात दक्षिण पुणे वकील संघटनेच्या वतीने आंदोलन करत दिवसभरासाठी काम बंद ठेवले. ३४ वर्षांपासून पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी वारंवार मागणी तसेच आंदोलने करण्यात आली. तरीदेखील सरकारच्या वतीने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असल्याचे अ‍ॅड. प्रवीण नलवडे यांनी सांगितले. उच्च न्यायालयामध्ये एकूण खटल्यामध्ये ४५ टक्के खटले पुणे शहर व जिल्ह्यातील असण्याबरोबरच या ठिकाणी खंडपीठ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोई सुविधा असतानादेखील या ठिकाणी खंडपीठ होत नसल्याने शहरापासून ते तालुकास्तरावरील सर्वच विविध वकील संघटनांनी अनेक दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. (वार्ताहर)