शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

देशात सांप्रदायिकता पसरवणे धोकादायक

By admin | Updated: November 15, 2015 00:42 IST

सनातनी विचारांच्या संघटना देशात सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध आणले जात नाहीत. ही बाब गंभीर आहे, असे मत आमदार आजित पवार यांनी व्यक्त केले.

माळेगाव : सनातनी विचारांच्या संघटना देशात सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध आणले जात नाहीत. ही बाब गंभीर आहे, असे मत आमदार आजित पवार यांनी व्यक्त केले. पवार पणदरे येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पवार म्हणाले, केंद्र व राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सनातनवादी संघटना सांप्रदायिकता पसरवू पाहत आहेत. ज्या नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केली त्या गोडसेच्या फाशीच्या दिवसाला हे लोक बलिदानदिन म्हणून साजरा करू पाहत आहेत. या वेळी संभाजी होळकर, बाबा पाटील, विलास जगताप, एम. एन. जगताप, अनिल जगताप, सुदामराव जगताप, रामभाऊ कोकरे, रमेश कोकरे, सत्यजित जगताप, जवाहर वाघोलीकर, अ‍ॅड. केशवराव जगताप, भगत जगताप, नारायण कोकरे, उपस्थित होते.कालव्याची सफाई लोकसहभागातून पणदरे गावातून जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत अजित पवार यांनी गावातील लोकांना एकत्र येत लोकसहभागातून कालव्याची साफसफाई व डागडुजी करण्याचे आवाहन केले आहे. पुरातन वास्तूंचे जतन करापणदरे गावाला मोठ्या प्रमाणावर प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, गावामध्ये इतिहासकालीन वाडे पाडून इमारती उभारल्या जात आहेत. त्याऐवजी अशा वास्तुंचे नूतनीकरण करून त्याचे प्रेक्षणीय स्थळ कसे बनविता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. यावर विचार व्हायला हवा, असे आवाहन पवार यांनी केले.काळूस : काळूस (ता. खेड) परिसरातील भीमा नदीपात्रातील ४ कृषिपंपांची चोरी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही घटना काल (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. तर, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. काळूसच्या उत्तरेकडील वाटेकरवाडी, निमगाव बंधारा परिसरातून कृषिपंपाच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वैतागला आहे. भीमा नदीपात्रातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ४ कृषिपंपांची मागील महिन्यात चोरी झाली होती. याच भागातून पुन्हा काल रात्री ४ कृषिपंप चोरट्यांनी चोरून नेले. सुमारे ७.५ ते १० अश्वशक्तीच्या पंपांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत बबन जाचक, दशरथ जाचक, वसंत आरगडे, हनुमंत आरगडे, भिवाजी पवळे यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकार या भागात वारंवार होत असून, यापूर्वी तांब्यांच्या तारांची चोरी होई. पण आता पूर्ण संचच चोरी होत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य पवनराजे जाचक यांनी सांगितले.