शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य लाभासाठी वाढले शहरी गरीब

By admin | Updated: April 5, 2017 00:48 IST

आरोग्य योजनांच्या लाभासाठीच ‘शहरी गरीब’ वाढल्याचे दिसून आल्याने आता राजीव गांधी योजनेशी शहरी गरीब योजना जोडली जाणार आहे

पुणे : आरोग्य योजनांच्या लाभासाठीच ‘शहरी गरीब’ वाढल्याचे दिसून आल्याने आता राजीव गांधी योजनेशी शहरी गरीब योजना जोडली जाणार आहे. या योजनेचे कार्ड असणाऱ्यांनाच भविष्यात आता लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरी गरीब योजनेतंर्गत अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. लोकप्रतिनिधींचे नातेवाईक व उच्च उत्पन्न गटांतील रुग्णांना याचा अधिक लाभ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या दहा वर्षांत योजनेसाठीचा खर्च ९३ लाख रुपयांवरून २६ कोटींवर पोहोचला. यामुळेच बोगस लाभार्थी टाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘शहरी गरीब योजना’ शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.शहराच्या हद्दीत राहणाऱ्या व एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना अर्थसहाय करण्यासाठी महापालिकेने सन २०१२-१३मध्ये ‘शहरी गरीब योजना’ सुरू केली. या योजनेतंर्गत महापालिकेकडून रुग्णांना सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य केले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे महापालिकेचे हेल्थकार्ड व शासकीय अधिकाऱ्यांचा एक लाखाच्या आता उत्पन्न असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. गेल्या सहा वर्षांत या योजनेंतर्गत शहरातील तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांना विविध दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ही योजना राबविताना अनेकदा रुग्णांकडून महापालिकेचे हेल्थकार्ड नसताना मागणी होऊ लागली. यामध्ये लोकप्रतिनिधींचा दबाव आल्यानंतर ऐनवेळी हेल्थकार्ड काढून मदत करणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत सादर न करणे, काही लोकप्रतिनिधींकडून आपल्याच नातेवाइकांना लाभ देणे, उच्च उत्पन्न गटातील रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी येणारा दबाव यामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)>योजनेला ‘आधार’ जोडणारया योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आरोग्य विभागाने ही योजना केंद्र शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेल्या नागरिकांची रेशनकार्ड काढतानाच राजीव गांधी आरोग्य योजनेसाठी नोंद केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिकिंगदेखील बंधनकारक आहे. त्यामुळे यापुढे राजीव गांधी आरोग्य योजनेचे कार्ड असणाऱ्या व्यक्तींनाच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशी अटदेखील घालण्यात येणार आहे. यासाठी योजनेत अनेक बदल करावे लागणार असून, याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.