शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

शहरामध्ये वाढले ध्वनिप्रदूषण

By admin | Updated: November 8, 2016 01:31 IST

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज वाढल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला असून, गतवर्षीच्या तुलनेत पिंपरीत तीन डेसिबल आणि चिंचवडला

पिंपरी : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज वाढल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला असून, गतवर्षीच्या तुलनेत पिंपरीत तीन डेसिबल आणि चिंचवडला चार डेसिबलने वाढ झाली आहे. दिवसाबरोबर रात्रीचेही ध्वनिप्रदूषण वाढले आहे.उद्योगनगरीत दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणवादी संस्थांच्या वतीने फटाकेविरहीत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले जाते. मात्र, दिवाळीतील फटाक्यांचा आवाज कमी झाला नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलेल्या तपासणीतून दिसून आले आहे. महापालिकेचा पर्यावरण विभागाच्या मदतीने पिंपरीतील डिलक्स चौक, चिंचवड येथील चापेकर चौकात ध्वनी प्रदूषण तपासण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली होती. ३० आॅक्टोबर लक्ष्मीपूजन, ३१ आॅक्टोबर दिवाळी पाडवा, एक नोव्हेंबर भाऊबीज अशी तीन दिवस तपासणी करण्यात आली. त्यात लक्ष्मीपूजनास फटाक्याचा आवाज अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यापाठोपाठ पाडवा आणि भाऊबीजेला फटाके वाजविले आहेत. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीची मर्यादा निश्चित केली आहे. दिवसासाठी ५५ डेसिबल, रात्री निवासी क्षेत्रासाठी ५५डेसिबल, सायलेंट झोनसाठी दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, शहरात या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे. निवासी क्षेत्र व बाजारपेठा या क्षेत्रात या वर्षी पाहणी करण्यात आली. त्यात मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. केवळ तपासणीचा सोपस्कार करण्यापलीकडे मंडळ कोणतेही काम करीत नाही, अशी टीका पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाला निविदांत रसमहापालिकेचा पर्यावरण विभाग केवळ नवीन प्रकल्पांच्या निविदा काढण्यात मश्गूल असतो. त्यातच अधिकाऱ्यांना रस आहे. पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करण्यापलीकडे पर्यावरण विभाग कोणतेही काम करीत नसल्याची पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. माहितीस टाळाटाळ दिवाळीच्या फटाका प्रदूषणाबाबत पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना माहिती विचारली असता, त्यांनी ती देण्याचे टाळले. ध्वनिप्रदूषण तपासणे हे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाते. ही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही, असे सांगितले. त्यानंतर मंडळाकडून याबाबतची माहिती मिळाली. या वर्षी शहरातील केवळ तीनच परिसरांची तपासणी केली. विविध भागात तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.प्रदूषणात वाढ गेल्या दोन वर्षांपूर्वी दिवाळीत पिंपरी डीलक्स चौकात प्रदूषण अधिक होते. त्यात घट झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषण वाढतच आहे. चिंचवड आणि चापेकर चौकात दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीपूजनात प्रदूषण अधिक होते ते गेल्या वर्षी कमी झाले. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रदूषण या वर्षी वाढले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीचे प्रदूषण वाढले आहे. पाडवा आणि भाऊबीज या दिवशी प्रदूषण कमी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.