शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढली झोपडपट्टी

By admin | Updated: August 9, 2016 01:32 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरातील झोपडपट्ट्यांमधील झोपड्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हे वास्तव असून, दर वर्षी किमान दहा टक्के झोपड्या प्रत्येक विभागात वाढत आहेत

भोसरी : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरातील झोपडपट्ट्यांमधील झोपड्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हे वास्तव असून, दर वर्षी किमान दहा टक्के झोपड्या प्रत्येक विभागात वाढत आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील पहिली झोपडपट्टी हगणदरीमुक्त म्हणून चर्चेत असलेल्या या प्रभागात घाणीच्या साम्राज्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. बालाजीनगर परिसरात सगळीकडे दलदल झाली असून, सगळीकडे अस्वच्छता दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ३७, महात्मा फुलेनगरमध्ये बालाजीनगर, लांडेवाडी व महात्मा फुलेनगर या तीन झोपडपट्ट्या येत आहेत. ९० टक्के भाग झोपडपट्ट्यांचा आहे. या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या सीमा सावळे व राष्ट्रवादीचे जितेंद्र ननावरे, नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता, दलदल, उघड्यावरील हगणदरी ही या भागातील प्रमुख समस्या आहे. तसेच या भागात हातभट्टी खुले आम विकली जात असे. गेल्या चार-पाच वर्षांत या परिसरात दारूअड्डा पूर्णपणे बंद आहे. या तिन्ही झोपडपट्ट्या हगणदरीमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक लाभार्थीला अनुदान दिले जात आहे. त्याचा फायदा या ठिकाणी चांगला झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानामार्फत महापालिका १८ हजार अनुदान घर टू घर शौचालयास मिळत आहेत. या परिसरात कसलाही दवाखाना नाही. बहुउद्देशीय हॉल, क्रीडांगणाची मागणी खूप वर्षांपासून आहे. या तिन्ही झोपडपट्ट्या एमआयडीसीमध्ये येतात.पिण्याचे पाणी एमआयडीसीकडून येते. या भागात गार्डन, स्मशानभूमीचे आरक्षण होते. त्याचे प्लॉट पाडून एमआयडीसीने विकले. त्यामुळे येथे काहीच विकासकामे करता येत नसल्याची तक्रार नगरसेवक करत आहेत. या ठिकाणी ठेकेदार काम करायला पुढे येत नाहीत. तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कचऱ्याची समस्या मोठी आहे. दररोज वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांवर कोणाचाही अंकुश नाही. महापालिका प्रशासन याबाबत ढिम्म आहे. त्यामुळे कितीही समस्यांचे निराकरण केले, तरी समस्या सुटणार नाहीत, अशीच परिस्थिती शहरातील झोपडपट्ट्यांची झाली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये दादागिरी, गुंडगिरी वाढत चालली आहे. या प्रकाराला राजाश्रय मिळत असल्याने अनेक गैरप्रकार घडत आहेत. मात्र, येथील दोन्ही नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांतील असूनसुद्धा समन्वय चांगला आहे. (वार्ताहर)