शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: May 25, 2017 02:46 IST

परिसरातील एक एकर जमीन नावावर करण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीदारांचे अपहरण करत त्यांना डांबून ठेवून जबर मारहाण केल्याप्रकरणातील पाच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुठा (ता. मुळशी) परिसरातील एक एकर जमीन नावावर करण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीदारांचे अपहरण करत त्यांना डांबून ठेवून जबर मारहाण केल्याप्रकरणातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. श्रीनाथ सुनील विटेकर (२९, रा. केळेवाडी, पौड रोड), प्रसाद विठ्ठल ढेणे (वय २९, रा. कर्वेनगर), अनंत रामचंद्र घरत (वय ३०), राजेश संजय शेलार (वय २२), विजय गणपतराव ज्वारी (वय २१, तिघेही रा. आंबिल ओढा) अशी कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ ते १९ मे दरम्यान घडली. अपहृत व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच मुठा भागात एक एकर ३ गुंठे जमीन खरेदी केली होती. त्याने दोन महिन्यांपूर्वी विटेकर व ढेणे यांच्याकडून ६० हजार रुपये उसने घेतले होते. ते त्यांना परतही केले. दरम्यानच्या काळात विटेकर व ढेणे यांना अपहृत दोघांकडे मुठा भागात एक एकर जमीन असल्याचे समजले. दोघांना धमकावून तसेच मारहाण करुन जबरदस्तीने जमीन घेता येईल, असे त्यांना वाटले. त्यानुसार त्यांनी दोघांचे अपहरण करण्याचा कट रचला. १५ मे रोजी शनिवार पेठेतून दोघांना दुचाकीवरून पळवून नेत अपहरण केले. त्यानंतर या दोघांना दांडेकल पूल भागातील एका इमारतीमध्ये डांबून ठेवत चार दिवस त्यांना जबर मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांना अटक करत त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास करण्यात आला. या वेळी त्यांनी फिर्यादीचे मोबाईल व गाडी जबरदस्तीने काढून घेत त्यांना शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी तसेच तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली.