शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘टवाळखोर’ विद्यार्थ्यांची वाढली डोकेदुखी

By admin | Updated: December 26, 2016 04:03 IST

शहरातील नामांकित महाविद्यालयांसह उपनगर परिसरातील महाविद्यालयांमध्ये काही टवाळखोर घुसून गोंधळ घालत आहेत.

पुणे : शहरातील नामांकित महाविद्यालयांसह उपनगर परिसरातील महाविद्यालयांमध्ये काही टवाळखोर घुसून गोंधळ घालत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडत चालले आहे. महाविद्यालयांसाठी हे टवाळखोर डोकेदुखी ठरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी महाविद्यालयांनी केली आहे. महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून नवीन विद्यापीठ कायदा मंजूर झाल्याने महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली जाते. त्यामुळे महाविद्यालयीन वातावरण बिघडू नये, या उद्देशाने आवश्यक हालचाली होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महाविद्यालयांचा परिसर मोठा असल्याने, तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवणे शक्य नसल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग केले पाहिजे.दोन दिवसांपूर्वी येरवडा परिसरातील गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयात काही टवाळखोरांनी बारावीच्या वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यात प्राचार्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे प्राचार्यांनी पोलिसांना बोलावले. मात्र, पोलीस महाविद्यालयात पोहोचेपर्यंत टवाळखोर पसार झाले. गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींना त्रास दिला जात असल्याने पोलिसांनीच अचानक महाविद्यालय परिसराला भेट देऊन टावळखोरांना ताब्यात घ्यायला हवे, अशी अपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सोमवंशी यांनी व्यक्त केली.सोमवंशी म्हणाले, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण काही टवाळखोर फिरताना दिसतात. (प्रतिनिधी)