शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

By admin | Updated: April 12, 2017 04:01 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून

- सतिश सांगळे,  कळस

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून खालावलेली भूगर्भातील पाणीपातळी वाढीस लागली आहे. आज सिमेंट बांध, तलाव पाण्याने भरलेले आहेत.विहिरी व हातपंप ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो झाले आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेतून होत असलेल्या कामांमुळे गावाचे चित्रच बदलत चालले आहे. शेळगावमधील वाड्यावस्त्या मिळून कडबनवाडी ग्रामपंचायत तयार करण्यात आली. या गावांची १५०० पर्यंत लोकसंख्या आहे. दहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर हे गाव फारसे चर्चेत नव्हते. मात्र, तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आदर्श ग्रामयोजनेत निवड होताच कधीही गावाकडे न फिरकलेल्या यंत्रणांच्या गावशिवारात फेऱ्या वाढल्या. तहसीलदार, गटविकास अधिकारी असे सर्व जण गावात जाऊन भेटी घेऊ लागले. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागातील विहिरींच्या पातळीत झपाट्याने घट झाली होती. गावाच्या एक हजार हेक्टरपैकी केवळ ४० टक्के शेतीच बागायती होती. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने प्रत्येक आमदाराला आदर्श ग्राम बनविण्याचे उद्दिष्ट दिले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या ग्रामपंचायतीची निवड केली. ग्राम दत्तक योजनेतील गावांना विशेष प्राधान्य देऊन विकास साधण्यासाठी आराखडा करून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले. शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. आधी फारशा सुविधा नव्हत्या. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ धोरणाची अंमलबजावणी झाल्याने आता पातळीत कमालीची वाढ झाली. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे. शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन समस्या जाणून घेतात. त्यासाठी शासनाकडे उपाय सुचवीत आहोत. आमच्या गावाचे चित्र बदलले आहे, असे जलसंधारणाचे प्रणेते भजनदास पवार यांनी सांगितले. गाव ठरेल मॉडेल व्हिलेजगावात याआधी अंगणवाडी होती. मात्र, अंगणवाडीला प्रशस्त जागा नसल्यामुळे बालकांच्या बसण्याची अव्यवस्था होती. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. गावातील बालकांना बसण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. गावातील युवकांचे शरीरसौष्ठव व्हावे, लष्कर व पोलीस भरतीसाठी युवकांना सज्ज करण्यासाठी येथे व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास चार कोटींपेक्षा अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात आली. तर दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच हे गाव एक मॉडेल व्हिलेज म्हणून समोर येणार आहे.शिवाराचाही कायापालट...या गावांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. गावाचे रूपडे जसे बदलते आहे, तसाच बदल शेतीतही दिसू लागला. खालावलेल्या पातळीला जलसंधारणाच्या कामांनी आधार दिला.नाला खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे, तलावाचे पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवणक्षमता वाढली. परिणामी, पातळीत वाढ होऊन या कामांचे फलित दिसू लागले. गावाच्या तिन्ही दिशेला सिंचन तलाव आहे. हे तलाव तुडुंब भरल्याने विहिरींच्या पातळीत वाढ झाली. २० फुटांच्या आत पातळी आली. याचा फायदा सिंचन वाढण्यासाठी होऊ लागला. गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावरही सिमेंट बंधारा बांधल्याने त्यातही पाणी अडले. एक किलोमीटरपर्यंत त्यात पाणी आहे. कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून या गावात शेकडो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली.