शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वशिलेबाज अधिकाऱ्यांची वाढली चिंता

By admin | Updated: February 26, 2017 03:45 IST

महापालिकेत वशिल्याने नोकरी मिळविलेल्यांपैकी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उतराई होण्यासाठी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ज्येष्ठ नगरसेवक यांच्या प्रचारात

पिंपरी : महापालिकेत वशिल्याने नोकरी मिळविलेल्यांपैकी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उतराई होण्यासाठी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ज्येष्ठ नगरसेवक यांच्या प्रचारात बिनधास्त सक्रिय सहभाग घेतला होता. निवडणूक आयोगाची आचारसंहिता, नियम धाब्यावर बसवून त्यांनी थेट निवडणूक प्रचार फेरीत सहभाग घेतला होता. ज्यांच्यासाठी त्यांनी काम केले, ते अनेक नगरसेवक निवडणुकीत पराभूत झाले. तर काही जण विरोधी बाकावर बसणार आहेत. उलट, ज्यांच्या विरोधात काम केले ते सत्तेत आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. आता आपले कसे होणार? या विवंचनेत ते पडले आहेत. महापालिका निवडणुकीत महापालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग हे पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नाही. महापालिकेत नोकरी मिळविण्यापासून ते हव्या त्या विभागात बदली करून घेणे, झालेली बदली थांबविणे, पदोन्नती पदरात पाडून घेणे असे विविध प्रकाराचे फायदे पदरात पाडून घेतले. ज्यांच्या वरदहस्ताने हे शक्य झाले. त्यांच्यासाठी कसलीही पर्वा न करता पाच वर्षांतून एकदा राबायचे, असे ठरवून प्रचारात काम करणारे अनेक जण दिसून आले. पदोन्नती झालेले अधिकारीही त्यात सहभागी होते. निवडणूक विभागाच्या नजरेतून ते सुटले असले तरी भाजपातील पदाधिकाऱ्यांच्या नजरेत ते भरले आहेत. ज्यांच्यासाठी काम केले, त्यांची सत्ता गेली असल्याने यापुढे प्रत्येक टप्प्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींना सामना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)पगार महापालिकेचा अन् चाकरी नगरसेवकांची पगार महापालिकेचा घेऊन नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या घरी राबणारे अनेक कर्मचारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहेत. नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हेच त्यांचे दैवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात प्रचारासाठी चक्क महापालिकेचा निधी वापरण्यात आला. ही अक्कलहुशारी पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच दाखविली. या कर्मचाऱ्यांनी केवळ प्रचारपत्रके वाटपापुरते सहकार्य केले नाही, तर मतदारांना पैसे वाटपाची यंत्रणा चक्क त्यांच्या घरातून राबविण्यात आली. कोणालाही शंका उपस्थित होणार नाही. या पद्धतीने महापालिकेचे कर्मचारी प्रचार यंत्रणेत राबले. काहींनी कर्मचाऱ्यांनी तर ठेकेदार, बिल्डर व खासगी कंपन्यांकडून विविध मार्गांनी पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक निधी गोळा करण्याचे कामही केले. त्यांना नवीन कारभाऱ्यांपुढे काम करताना पदोपदी अडचणीची भीती वाटत आहे.