शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांची भारवहन क्षमता वाढ

By admin | Updated: January 31, 2016 04:30 IST

देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वहन क्षमतेपेक्षा ५ टक्के अधिक वजन वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढली असून, त्या आधारे

पुणे : देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वहन क्षमतेपेक्षा ५ टक्के अधिक वजन वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढली असून, त्या आधारे राज्य शासनानेही या जादा वजन वाहण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील तब्बल ७ लाख मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मिळणार आहे. ही वजन वहन क्षमता वाढवून देण्याची मागणी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे सदस्य बाबा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या नवीन आदेशाबाबतच्या सूचना राज्य शासनाने सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १३३ नुसार, माल वाहतूक करणारी वाहनांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वजन क्षमतेपेक्षा जास्त वजन गाडीत भरल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येत होता. तसेच दंडही आकारण्यात येत होता. त्यासाठी प्रतिटन २५०० रुपयांचा दंड आकारला जात होता. यात प्रामुख्याने ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, टे्रलर या वाहनांचा समावेश होता. ही वजन क्षमता वाढविण्याची मागणी संघटनेने केली होती. नव्या आदेशानुसार या वहन क्षमतेपेक्षा ५ टक्के जादा वजन असल्यास कारवाई केली जाणार नाही. समजा एखाद्या गाडीची वहन क्षमता १६ टन असेल, तर त्याच्या ५ टक्के म्हणजेच ८०० किलो अतिरिक्त वजन घेऊन जाता येणार आहे.