शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
5
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
6
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
7
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
8
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
9
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
10
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
11
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   
12
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
13
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
14
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
16
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
17
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
18
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
19
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
20
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."

फळभाज्यांच्या भावात वाढ

By admin | Updated: July 3, 2017 02:23 IST

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा वगळता कांदा, भुईमूग शेंग व लसूण यांची आवक घटली. कांदा व बटाटा भाव वधारले, भुईमूग

लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा वगळता कांदा, भुईमूग शेंग व लसूण यांची आवक घटली. कांदा व बटाटा भाव वधारले, भुईमूग शेंगाचे भाव घसरले. लसणाचे भाव स्थिर राहिले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक घटली. शेलपिंपळगाव उपबाजारात या आठवड्यातही भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, शेपू व मेथी आणि पालकची आवक मंदावली. जनावरांच्या बाजारात म्हशी वगळता, जर्शी गाय, बैल, शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. जनावरांच्या बाजारात एकूण उलाढाल १ कोटी ते ७५ लाख रुपये झाली. तर एकूण २ कोटी २० लाख रुपयाची उलाढाल चाकण बाजारात झाली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४७५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५५ क्विंटलने कमी झाली. भाव मात्र ७५० रुपयांवरुन ८२५ रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार ७०५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १४५ क्विंटलने वाढली. कमाल भाव ७५० रुपयांवरून ८०० रुपये झाला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक ४० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २० क्विंटलने घटली. या शेंगांचा कमाल भावही ६ हजार २०० रुपयांवरून ५८०० रुपये झाला. या सप्तहातही बंदूक भुईमूग शेंगांची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ६ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व २ क्विंटलने घटली. कमाल भावही ५००० रुपयांवर स्थिर झाले.हिरव्या मिरचीची एकूण आवक २१४ क्विंटल झाली. भावातही वाढ झाली. हिरव्या मिरचीला ५००० ते ६५०० रुपये असा कमाल भाव मिळाला.शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणेकांदा - एकूण आवक - ४७५ क्विंटल. भाव क्रमांक १ - ८२५ रुपये, भाव क्रमांक २ - ६५० रुपये, भाव क्रमांक ३ - ५०० रुपये. बटाटा - एकूण आवक - १७०५ क्विंटल. भाव क्रमांक १ - ८०० रुपये, भाव क्रमांक २ - ७०० रुपये, भाव क्रमांक ३ - ५०० रुपये.फळभाज्या : फळभाज्यांची एकूण आवक व भाव : टोमॅटो - ६०८ पेट्या (१५०० ते ३५००रुपये), कोबी २०१ (१००० ते १४००रुपये), फ्लॉवर - ३६१ पोती (५०० ते १०००रुपये), वांगी - १६१ पोती (३५०० ते ४५०० रुपये), भेंडी - २३५ पोती (४००० ते ५००० रुपये), दोडका ९७ (३०००ते ४०००), कारली - १६८ डाग (३००० ते ४००० रुपये), दुधीभोपळा - १९४ पोती (५०० ते १५०० रुपये), काकडी - १८४ पोती ( १००० ते २००० रुपये), गवार - १६७ पोती (२५०० ते ३५००), फरस बी ४७ (४०००ते ६०००), ढोबळी मिरची ४१९ (३००० ते ४०००), शेवगा - ६७ पोती (३००० ते ४००० रुपये), चवळी ५० (२००० ते ३००० रुपये)पालेभाज्या : भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व शेकडा भाव : मेथी- एकूण ४ हजार ६९० जुड्या (१००० ते २००० रुपये), कोथिंबीर - एकूण ५ हजार ९१० जुड्या (२००० ते ३००० रुपये), शेपू - २ हजार ४६० जुड्या (१००० ते १५००), पालक - ३ हजार ६४८ जुड्या (५०० ते ८०० रुपये)जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५० जर्शी गार्इंपैकी ३५ गार्इंची विक्री झाली. (१०,००० ते ५०,००० रुपये), १५५ बैलांपैकी ९५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३०,००० रुपये), १२० म्हशींपैकी ७० म्हशींची विक्री झाली (२०,००० ते ७०,००० रुपये), ८७२५ शेळ्या-मेंढ्यांपैकी ८१०० शेळ्या-मेंढ्यांची विक्री झाली (२,००० ते १०,००० रुपये) अशी जनावरांची विक्री झाली .