शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस-नागरिक सलोखा वाढावा

By admin | Updated: May 7, 2017 02:49 IST

मावळ तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी व भयावह गुन्हे घडून देखील त्यांची न होणारी उकल हे पोलिसांचे

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मावळ तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी व भयावह गुन्हे घडून देखील त्यांची न होणारी उकल हे पोलिसांचे जनमाणसातील सलोख्याचे संबंध कमी झाले असल्याचे धोतक म्हणावे लागेल. म्हणून पोलिसांनी नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे मावळ तालुक्यासारख्या संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत खून, दरोडे, जबरीचोरी, घरफोडी, महिला अत्याचार सारख्या घटना वाढू लागल्या आहेत. दिवसा ढवळ्या या घटना घडत असताना पोलिसांना या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी काहीही धागेदोरे हाती लागत नाही. महिनोनमहिने आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. नागरिकही पोलिसांना घटनांची माहिती देण्यासाठी धजावत नाहीत हे पोलिसांची जनमाणसातील प्रतिमा खालावल्याचे उघडे सत्य आहे. जसा पोलीस हा खाकी वर्दीतील माणूस आहे तसाच माणूस हादेखील साध्या वेशातील पोलीस आहे हे साधे समीकरण पोलिसवाले विसरले आहेत. सध्या बहुतांश गुन्ह्यांची उकल ही सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल लोकेशनवर केली जाते. मात्र, ज्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे, असे गुन्हे महिनोनमहिने पडून आहेत. ना आरोपींचा शोध लागतो, ना नागरिकांना न्याय भेटतो. ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल नव्हते अथवा त्यातील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी विकसित झालेली नव्हती. तेव्हा हेच साध्या वेशातील पोलीस हे कायद्याचे नाक, कान व डोळे होते. आता सर्वच पोलीस ठाण्यांची परिस्थिती बदलली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक व सर्वसामान्यांना गुन्हेगारांची वागणूक दिली जाते. किरकोळ प्रथमदर्शनी गुन्हे मिटत असताना नागरिकांना त्रास दिला जातो. अनेकवेळा गुन्हा केलेला नसतानाही खऱ्या गुन्हेगाराची मर्जी सांभाळण्यासाठी सर्वसामान्यांचा बळी दिला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढण्यासही धजावत नाहीत. नागरिकांच्या मनातील पोलिसांबाबतची नकारात्मक प्रतिमा बदलण्याची गरज आहे.पोलिसांचा नाहक ससेमिरा मागे नको, म्हणून नागरिक देखील एखादी घटना माहीत असूनही पोलिसांना सांगत नाही. कारण पोलिसांची समाजमनातील विश्वासार्हता कमी झाली आहे. पोलिसांनी समाजाभिमुख काम केल्यास समाजही नक्कीच पोलिसांभिमुख काम करेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना एकत्र बोलावून समज देण्याची वेगळी प्रथा सध्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पहायला मिळत आहे. खरे तर पोलिसांनी नागरिकांसोबत सलोख्यांचे संबंध प्रस्तापित करून स्वत:चे माहितीचे स्रोत वाढविल्यास वाढत्या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल. साध्या वेशातील पोलिसांचा नाक,कान व डोळे म्हणून उपयोग केल्यास गुन्ह्यांची उकलही तत्काळ होईल, असा आशावाद जाणकार व्यक्त करीत आहेत.