शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढीचा पीएमपी, एसटीला फटका

By admin | Updated: February 14, 2016 03:23 IST

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाना शुल्क तसेच नूतनीकरणाच्या शुल्कात राज्य शासनाकडून वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे परवाना शुल्क ४०० रुपयांवरून १००० रुपये

पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाना शुल्क तसेच नूतनीकरणाच्या शुल्कात राज्य शासनाकडून वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे परवाना शुल्क ४०० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आले आहे. याचा फटका शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)सह राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या पुणे विभागातील बसलाही बसणार आहे. या दोन्ही वाहतूक व्यवस्थांच्या प्रत्येकी १२०० बसची नोंदणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहे, तर या वाहनांनाही काही ठराविक कालावधीनंतर वाहन परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. गृह विभागाने महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ मधील नियम ७५ मधील परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी मोटार वाहनांकरिता नवीन परवाने, परवाना नूतनीकरण, राष्ट्रीय परवाना, पर्यटक परवाना, तात्पुरता परवाना प्रतिस्वाक्षरी परवाना आदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, तर परवाना शुल्कवाढ करतानाच, वाहनांच्या नूतनीकरणाच्या दंडाच्या रकमेतही राज्य शासनाने पन्नास पटीने वाढ केली असून, हे विलंब शुल्क प्रतिमहिना १०० रुपयांवरून तब्बल ५ हजार रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीत टप्पा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी नवीन नूतनीकरण करण्यासाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागत होते. आता हे शुल्क एक हजार रुपये करण्यात आले आहे. शहरात पीएमपीच्या मालकीच्या तब्बल १२०० बस आहेत. या बसच्या परवाना नूतनीकरणासाठी पीएमपीला प्रतिबस ४०० रुपयांचा खर्च येत होता. आता खर्च प्रतिबस १ हजार रुपये झाल्याने परवाना नूतनीकरणासाठी आता पीएमपीला १२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य शासनाशी पत्रव्यवहार सुरूया शुल्कात वाढ झाल्याने आता या करात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे परवाना शुल्कवाढीतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना दिलासा मिळावा, या मागणीसाठी राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.