शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

टेकड्यांसह संवेदनशील ठिकाणांवरची गस्त वाढवणार

By admin | Updated: February 28, 2016 03:50 IST

शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना

पुणे : शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले. हनुमान टेकडीवर पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चोरट्याने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत’च्या सविस्तर वृत्ताची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून,याभागात ‘महिला मार्शल्स’ची संख्या वाढवण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हनुमान टेकडीवर बुधवारी संध्याकाळी पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी विजय विकास कांबळे (वय २१, रा. वडारवाडी) याला अटक केली आहे. या घटनेच्या निमित्ताने शहरातील टेकड्यांवर जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबतची सद्य:स्थिती आणि महिला सुरक्षा समितीच्या अहवालाकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. ‘लोकमत’च्या टीमने शुक्रवारी काही टेकड्यांवर फिरून सुरक्षेचा आढावाही घेतला. यासोबतच महिला, तरुणी आणि नागरिकांमध्ये स्वत:च्याच सुरक्षेबाबत असलेली उदासीनताही समोर मांडली. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी घेतली आहे. टेकड्यांवर, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. यासोबतच पोलिसांना अशा घटनांबाबत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात महिला पोलिसांची गस्त वाढवण्यावर भर देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी वाहनांनी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महिला आणि तरुणींनीही निर्जनस्थळी जाताना सुरक्षेचा विचार करावा. स्वत:ला धोका होईल अथवा इजा पोहोचेल, अशा ठिकाणी जाणे टाळावे. जर शंकास्पद काही वाटलेच तर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांना अवश्य मदत पुरवली जाईल, असा वडीलकीचा सल्लाही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. टेकड्यांची सुरक्षा ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही. वन विभागानेही यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महिला सुरक्षा समितीमध्ये पोलिसांसह महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधीही आहेत. सुरक्षेचा मुद्दा आला, की केवळ पोलिसांकडे बोट दाखवून चालणार नाही. उर्वरित विभागांनीही त्यांची जबाबदारी ओळखून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण पोलीस सुरक्षेसाठी असले, तरी बाकी सर्व महत्त्वाच्या उपाययोजना उर्वरित विभागांनाच कराव्या लागणार आहेत.