शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चाकण बाजारात कांद्याच्या भावात वाढ

By admin | Updated: January 9, 2017 02:15 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात वाढ झाली

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात वाढ झाली आहे. ही आवक ६८० क्विंटलने वाढली आहे, तर बटाट्याच्या भावात व आवकेमध्ये घसरण झाली आहे. बाजाराची एकूण उलाढाल २ कोटी ४८ लाख रुपये झाली असल्याची माहिती सचिव सतीश चांभारे यांनी दिली.कांद्याला या आठवड्यात ४०० ते ८५० रुपये असा प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक वाढून भावात १५० रुपयांनी वाढ झाली. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण ८१०० क्विंटल (१६ हजार २०० गोणी) आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६८० क्विंटलने वाढूनही भावात १५० रुपयांची वाढ झाली. बटाट्याची एकूण आवक १३५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८५० क्विंटलने घटून भावातही १५० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव ५०० रुपयांवरून ८०० रुपये झाला.लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व भाव स्थिर राहिले. कमाल भाव १२०० रुपये झाले.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात १ लाख ९० हजार जुड्या मेथीची आवक झाली. १ लाख १५ हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. शेलपिंपळगाव आवारात मेथीची ४४ हजार जुड्या, तर कोथिंबिरीची २१ हजार जुड्या आणि शेपूची २ हजार ५०० जुड्यांची आवक झाली.चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ४१० पोती झाली असून, मिरचीला प्रतिक्विंटल १,००० ते १५०० रुपये असा भाव मिळाला.