पुणे : गणेश विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने नदीकिनार परिसर व अन्यत्र नियमित हौदापेक्षा अधिक अतिरिक्त सुमारे ९६ लोखंडी टाक्या उभारून विसर्जनाकरिता अतिरिक्त सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आले.औध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शोभा आपटे घाट, राजीव गांधी घाट येथे ३, घोले रस्त्यांतर्गत वृद्धेश्वर पतंगा, एस. एम. जोशी, पांचाळेश्वर घाटांवर १८, वारजे कर्वेनगर अंतर्गत स्मशानभूमी, कर्वेनगर स्मशानभूमी गांधी भवन, डहाणूकर कॉलनी घाट परिसरात २३, ढोले पाटील अंतर्गत संगम घाट, शाहूतलाव बंडगार्डन, संत माळी, चव्हाण घाट्या परिसर टिळकरस्ता अंतर्गत विठ्ठलवाडी, दत्तवाडी, एस.एम. जोशी पूल घाट परिसर येथे ४, सहकारनगर अंतर्गत तळजाई, ढुमे शाळा या ठिकाणी १२ धनकवडी अंतर्गत चिंतामणी देशमुख शाळा, उर्दू , कमला सिटी, उत्कर्षा सोसायटी, कात्रज गावठाण, कात्रज रॅम्प, गुलाब नगर, तळजाई परिसरात ७, बिबवेवाडी अंतर्गत भिमाले गार्डन, यशवंतराव चव्हाण भवन या ठिकाणी ४ कोंढवा, वानवडी अंतर्गत शिंदे छत्री वानवडी, शरद पवार उद्यान कोंढवा, संत गाडगेबाबा शाळा, काकडेवस्ती कोंढवा या परिसरातील ठिकाणी सयुक्तरीत्या २ या प्रमाणे लोखंडी टाक्या अतिरिक्त स्वरूपात ठेवण्यात आलेल्या असून, विसर्जनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.श्रीगणेश विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार यांनी नदी किनारच्या विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, वैद्यकीय व्यवस्था, अग्निशमन, स्वच्छता, विसर्जनमार्ग, विद्युत व्यवस्था, कर्मचारी नियोजन अशा सर्व व्यवस्थेसंदर्भात माहिती घेतली. मुख्यत्वे करून पांचाळेश्वर ते पतंगा घाट या ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मानाच्या गणपतींच्या मंडळांनीही हौदामध्ये श्री गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पांचाळेश्वर घाट येथील विसर्जन हौद, लोखंडी विसर्जन हौद व इतर सुविधांची पाहणी केली. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांची दखल घेऊन आवश्यक पूर्तता केली जाईल, सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप, उपायुक्त माधव जगताप, सुनील केसरी यांनी सांगितले.पाहणी प्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील रामानंद, उपअभियंता राजेश बनकर, नीलेश वाघमोडे, संदीप चाबुकस्वार आदी उपस्थित होते.४श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे श्री गणेशमूर्ती विसर्जन पतंगा घाट (नटराज सिनेमामागे) आणि श्री तुळशीबाग, श्री केसरी, सार्वजनिक गणेशोत्सव; तसेच अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मार्केटयार्ड सार्वजनिक गणेशोत्सव, भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पांचाळेश्वर येथे होणार असल्याचे उपायुक्त सुनील केसरी व सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी कळविले आहे.
विसर्जन हौदांच्या संख्येत वाढ
By admin | Updated: September 27, 2015 01:39 IST