शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर सायबर गुन्ह्यांंमध्ये वाढ

By admin | Updated: April 24, 2017 05:15 IST

नोटबंदीच्या निर्णयानंतर गेल्या तीन महिन्यांत नेट बँकिंगच्या गुन्हयात वाढ झाली आहे, तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीच्या तक्रारींही लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.

नम्रता फडणीस / पुणेनोटबंदीच्या निर्णयानंतर गेल्या तीन महिन्यांत नेट बँकिंगच्या गुन्हयात वाढ झाली आहे, तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीच्या तक्रारींही लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. सायबर सेलकडे तक्रारींचे १३७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात तक्रारींचे प्रमाण हे २ हजार इतके होते. नेट बँकिंगद्वारे आर्थिक फसवणुकींसह सोशल मीडियावर बदनामीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत चालल्याने सायबर सेलपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मोबाईलवरच्या चॅटिंगमधून टकटक करणारी अनेकांची बोट नोटाबंदीच्या निर्णयानंतर ‘नेट बँकिंग’ व्यवहाराकडे वळली आणि कॅशलेसच्या दिशेने प्रवास सुरू झाला. बँकांकडून क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड घेतली, मात्र हे व्यवहार करताना साधी चूकही नडू शकते, नेट बँकिंगचे व्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत लोकांमधील जागरूकतेच्या अभावामुळे गुन्हेगारांच्या हातात आयतेच कोलित मिळाल्यासारखे झाले आहे. नेट बँकिंग व्यवहार करणाऱ्या लोकांची अकाऊंट हॅक करून फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. तसेच सोशल मीडियाच्या दुधारी शस्त्राचा वापर करत तरुणींची आक्षेपार्ह छायाचित्र अथवा मजकूर टाकून बदनामी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या संवादाची दालने खुली करणाऱ्या या सोशल माध्यमांनी जगभरातील माणसांना जवळ आणले असले तरी वैयक्तिक माहितीचा डेटा सहजपणे उपलब्ध केला जात असल्याने तरुणींची बदनामी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. तरुणींचे फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप हॅक करून त्यांची अश्लील छायाचित्रे, मजकूर पाठविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१६ मध्ये मेल हॅकिंग ९०, फेसबुक अकाऊंट हॅकिंग ९७, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे बदनामीच्या ७८ घटना घडल्या आहेत. तर २०१७ मध्ये मेल हॅकिंग ४४, फेसबुक हॅकिंग ५४ व्हॉट्स अ‍ॅपवरील बदनामीच्या ५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोशल मीडियावरील बदनामीच्या बहुतांश घटना या जवळच्या व्यक्तींकडूनच नोंदविल्या जातात. म्युच्युअल फ्रेंड आहे, म्हणून पासवर्ड किंवा यूआरएल लिंक शेअर करणे अशा गोष्टी नकळतपणे घडतात, त्यातूनच फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप हॅक करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.