पुणे : शहरात शुक्रवारी २०१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २०४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ३९५ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़ ९ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९१ इतकी आहे़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७५३ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही आजमितीला २ हजार १० इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख १९ हजार ७३६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८५ हजार ५५८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७८ हजार ७९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================