शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वीज भरणा केंद्रात गैरसोयींचा ‘शॉक’

By admin | Updated: April 12, 2016 04:30 IST

शहरातील साडेपाच लाख वीज ग्राहक दर महिन्यास कोट्यवधी रुपये दर महिन्यास भरणा करतात. मात्र, वीजभरणा केंद्रावर त्यांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. वीज भरणा

पिंपरी : शहरातील साडेपाच लाख वीज ग्राहक दर महिन्यास कोट्यवधी रुपये दर महिन्यास भरणा करतात. मात्र, वीजभरणा केंद्रावर त्यांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. वीज भरणा करून महावितरणाला आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या नागरिकांनाच तुच्छ वागणूक दिली जात असल्याचे चित्र आहे. शहरात पिंपरी व भोसरी हे महावितरणचे दोन विभाग आहेत. महिला बचत गट, पतसंस्था, बॅँका आणि सामाजिक संस्थांच्या शहरातील विविध केंद्रांवर बिले स्वीकारली जातात. नागरिक १०० रुपयांपासून तब्बल ५० हजार रुपयांपर्यंत रकमेचे बिल भरतात. मात्र, त्यांना केंद्रावर स्वागतार्ह वागणूक दिली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. महावितरणचे खासगीकरण होऊनही त्यात बदल झाल्याचे दृष्टीस पडत नसल्याने नागरिकांची नाराजी आहे. पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांची नोट दिल्यास सुटे पैसे देण्याचा आग्रह धरला जातो. त्यामध्ये नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक केंद्र अडगळीच्या आणि आडोशाला छोट्याशा खोलीत आहेत. त्यामुळे ये-जा करणे त्रासदायक ठरते. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत भरणा केंद्राची वेळ आहे. मात्र, या वेळेत अनेकदा केंद्रात कर्मचारी उपलब्ध नसतात. जेवण्याची वेळ अर्ध्या तासाची असताना तासभर केंद्र बंद ठेवली जातात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे लागते. वेळ संपण्यास १५ ते २० मिनिटे शिल्लक असतानाच खिडकी बंद केली जाते. त्यामुळे नागरिकांना बिल न भरताच परतावे लागते. साप्ताहिक सुटी, सणासुदीच्या दिवशी केंद्र बंद असते. सुटीच्या दिवशी वीज खंडितची कारवाई झाल्यास कामकाजाच्या दिवशाची वाट पाहत प्रतीक्षा करावी लागते. अनेक ठिकाणी वाहन लावण्यासाठी वाहनतळाची सुविधा नाही. नाइलाजास्तव रस्त्यावर वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. पिंपरी आणि रहाटणी येथील महावितरणच्या केंद्रावर रोख बिल भरण्याचे यंत्र (कॅश पेमेंट बिल मशिन) आहे. ते चोवीस तास सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र, ते अनेकदा बंद असते. कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक उपस्थित असल्याखेरीज येथे रक्कम स्वीकारली जात नाही. हे यंत्र आतील बाजूस असल्याने नागरिकांना थेट या यंत्रात रक्कम भरता येत नाही. (प्रतिनिधी)अनेक ठिकाणी केंद्रावर नाही छतअनेक ठिकाणी केंद्रावर छत नाही. उन्हाचा तडाखा सहन करीत नागरिकांना नाईलाजास्तव रांगेत उभे राहावे लागते. पावसात भिजतच प्रतीक्षा करावी लागते. आजूबाजूला साचलेल्या चिखल पाण्यातच रांगा लावल्या जातात. काही केंद्र वरच्या मजल्यावर आहेत. त्या ठिकाणी पायऱ्या चढून जाण्यास वयस्कांना त्रासदायक ठरते. बहुतेक ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. उन्हात दमून-भागून आलेल्या नागरिकांना असंख्य गैरसोयींचा सामना करावा लागतो. अपंगासाठी व्हीलचेअर रॅम्पची सोय कोठेच नाही. बिल भरल्याची पावती आणि बिल एकत्रित करून स्टेपलरची पिन मारून पूर्वी बिल दिले जात होते. आता मात्र ‘स्टेपलर मागू नये’ अशी सूचना खिडकीवर लावली गेली आहे. काही ठिकाणी साध्या टाचणी ठेवल्या आहेत. ‘आॅनलाइन’चाही मनस्तापपुणे जिल्ह्यात आॅनलाइन वीज बिल भरणा पिंपरी विभागात सर्वांत मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या आॅनलाइन भरणा करूनही अनेकाना ‘वीज कट’च्या कारवाईस सामोरे जावे लागते. पिंपळे सौदागर भागातील अनेक रहिवाशांना मुदतीत आॅनलाइन बिल भरूनही त्यांची वीज कट केली गेली होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अंधारात दिवस काढावा लागला. आॅनलाइन बिल भरल्याचे अपडेट न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याचे नंतर सावरासावर केली गेली. ई - बॅँकिंगची हाताळणी करता येत नाही.