शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय

By admin | Updated: November 18, 2016 05:54 IST

तालुक्यातील ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील

दौंड : तालुक्यातील ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ७६ ग्रामसेवकांनी आपल्या कागदपत्रांच्या कपाटाच्या किल्ल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात विकासकामे आणि आर्थिकतेवर याचा परिणाम होणार आहे. ७६ ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार ग्रामपंचायतीत कंत्राटी ग्रामसेवक असल्याने ते संपावर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे डाळिंब, नाथाचीवाडी, पेडगाव, टेळेवाडी या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत राहणार आहे. कंत्राटी सेवक म्हणून सुरुवातीला तीन वर्षे काम करणाऱ्या ग्रामसेवकांची सेवा त्यांच्या कालावधीत नियमित करावी, दरमहा पगारात ३ हजार रुपयांचा प्रवासभत्ता मिळावा, रोजगार हमी योजनेचे कामकाज स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावे, ग्रामसेवकांवर होणारे प्राणघातक हल्ले याबाबत ग्रामसेवकांना संरक्षण मिळावे, ग्रामसेवकांवर होणाऱ्या प्रशासकीय कारवाया थांबवाव्यात यांसह अन्य काही ग्रामसेवकांच्या मागण्या आहेत. त्यामुळे या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. अन्यथा यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.