शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदीने जेजुरीत गैरसोय

By admin | Updated: November 17, 2016 01:39 IST

सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे.

जेजुरी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी व कामगारांनी या निर्णयाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य कामगार, शेतकरी, हातावर पोट असणारे विक्रेते-व्यवसायिक यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा भरण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र ज्या शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नाही. त्यांना मर्यादित नोटा भरून (फक्त ४,५००) रक्कम स्वीकारावी लागत होती; त्यासाठी प्रचंड वेळ रांगेत उभे राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत ६ ते ७ हजार खातेदार असून गेल्या ८ तारखेपासून आजपर्यंत ३ ते ४ कोटी रुपये ५०० व १,००० नोटांच्या स्वरूपात भरणा झाला आहे. यामध्ये नोटा बदलून दिलेली रक्कमही आहे. मात्र १००, ५०, २०, १० व नव्याने आलेली २,००० रुपयांची उपलब्धता होईल तसे व्यवहार सुरळीत करण्यासाठी शाखा व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. गेल्या दोन दिवसांपासून बँकेमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र बोटावर शाई लावण्याबाबतचेकोणतेही आदेश वरिष्ठ पातळीवरून आले नसल्याचे शाखाप्रबंधक अमित आनंद यांनी सांगितले.ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य कामगार विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे व्यवहार जिल्हा बँकेमध्ये असतात. त्यामुळे बहुतांश नागरिकांची दोन दिवसांपासून प्रचंड गैरसोय होत आहे. वीजबिले भरणा करताना अथवा सोसायटीकर्ज भरणा करताना अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे जिल्हा बँकेचे शाखाधिकारी प्रतापराव भुजबळ यांनी सांगितले. पतसंस्था व सहकारी बँकेमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी सभासद आहेत. सध्या नोटाटंचाईमुळे व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याने व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. मात्र पतसंस्थेशी निगडीत असलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे काही नाही. सहकारी बँकांना मोठ्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यानेच नागरिकांची असुविधा होत असल्याचे व त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत असल्याचे कडेपठार पतसंस्थेचे माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)