शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानातील अपूर्ण कामे सुरू

By admin | Updated: January 11, 2017 03:07 IST

निगडी-प्राधिकरणातील नऊ एकर परिसर असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील अनेक कामे अर्धवट अवस्थेत

रावेत : निगडी-प्राधिकरणातील नऊ एकर परिसर असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील अनेक कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे निधी मंजुरी असूनसुद्धा कामे पूर्ण केव्हा होणार, याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दाखल घेऊन पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी स्थायी समितीमध्ये प्राधिकरण परिसरातील पेठ क्रमांक २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाकरिता संरक्षण भिंत व इतर कामाकरिता अंदाजे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. चांगल्या असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाकरिता अनेक नागरिकांनी त्या वेळेस विरोधही दर्शविला. परंतु संरक्षण भिंतीचे काम तार न लावता आटोपण्यात आले होते. त्यामुळे भिंतीवरून सहज उद्यानात प्रवेश करता येतो. छोट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली होती. प्रसाधनगृहातील नळ, प्लॅस्टिक पाईप यांची तीनदा चोरी झाली होती. शहरातील एकमेव नक्षत्रवाटिकेतील आयुर्वेदिक झाडांना धोका निर्माण झाला होता. तसेच स्वागत कमानसुद्धा अर्धवट अवस्थेत होती. गेले अनेक महिने काम ‘जैसे थे’ होते. स्थापत्य विभागाने या वृत्ताची दाखल घेऊन अर्धवट कामाला सुरुवात केली आहे. उद्यानाची देखभाल चांगली आहे. लॉन हिरवळ , छाटनी योग्य आहे, परंतु मातीअभावी अनेक ठिकाणी हिरवळ अर्धवट अवस्थेत आहे, छोट्या वृक्षांची वाढ खुंटली आहे. उद्यानाला कमीत कमी २० ट्रक मातीची आवश्यकता आहे. झाडांच्या पोषणाकरिता हिवाळ्यामध्येच माती टाकणे उद्यानाकरिता गरजेचे आहे. आता गणेश तलाव सप्लाय स्टॅन्ड बाय पाणी मोटर, झाकण असलेली २० डस्ट बिन, नवीन फायबर विद्युत दिवे, संत ज्ञानेश्वर म्युरल (ज्ञानेश्वरी ग्रंथासोबत), बसण्यासाठी नवीन बाक ही उरलेली कामे प्रतीक्षेत आहेत. ही कामेसुद्धा लवकरात लवकर पूर्ण केली जातील, अशी ग्वाही पालिका स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता कांबळे यांनी दिली आहे. (वार्ताहर)