शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकर सवलत ‘आॅफलाईन’

By admin | Updated: January 6, 2017 07:08 IST

आयटी उद्योगाला निवासी दराने मिळकतकराची आकारणी करण्यास मंजुरी देणाऱ्या पालिका सभागृहाने आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांना मिळकतकरामध्ये ५ टक्के

पुणे : आयटी उद्योगाला निवासी दराने मिळकतकराची आकारणी करण्यास मंजुरी देणाऱ्या पालिका सभागृहाने आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांना मिळकतकरामध्ये ५ टक्के सवलत देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मात्र फेटाळून लावला. सत्ताधारी राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाचा प्रस्तावाला पाठिंबा होता, तर काँग्रेस व मनसेने त्याला तीव्र विरोध केला.केंद्र सरकारच्या कॅशलेस धोरणाला पाठिंबा म्हणून अशी सवलत जाहीर करण्यात येत आहे का, असा सवाल काँग्रेस-मनसेने केला. त्यांच्या विरोधामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंब्यातील रस काढून घेतला. त्यामुळे हा प्रस्ताव थेट मार्च २०१७च्या म्हणजे निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या नव्या सभागृहापुढे चर्चेसाठी येईल. प्रामाणिकपणे कर भरणारे सोडून अन्य सर्व घटकांना करामध्ये सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे का, अशी विचारणा अविनाश बागवे यांनी केली. आबा बागुल यांनी यामुळे पालिकेला किती रकमेवर पाणी सोडावे लागेल, याचा अंदाजही न देता प्रशासनानेप्रस्ताव ठेवला असल्याबद्धल टीका केली.काँग्रेसचे अरविंद शिंदे, बागुल, मनसेचे किशोर शिंदे, राजेंद्र वागसकर यांनी याला तीव्र विरोध केला. अशोक येनपुरे यांनी सवलतीची टक्केवारी कमी करावी, असे सुचवून नंतर प्रस्ताव मंजूर करा, असे सांगितले. भाजपाचे सदस्य तसेच राष्ट्रवादीचे सभागृहनेते बंडू केमसे त्यांना विरोध करू नका, असे सांगत होते. आयुक्त कुणाल कुमार हेही प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आग्रही होते. मात्र, अशी सवलत का द्यायची, अशी विचारणा करीत काँग्रेस, मनसेने आपला विरोध कायम ठेवला. अखेर हा प्रस्ताव मार्च २०१७मध्ये घेण्याचा निर्णय झाला. (प्रतिनिधी)