शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ दिवसभर ‘हँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:19 IST

प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्याचा सोमवार शेवटा दिवस असल्याने अनेकांची सकाळपासूनच धांदल उडाली होती. मात्र, प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ सकाळी दहा वाजल्यापासून डाऊन झाल्यामुळे विवरण भरण्याची प्रक्रियाच कोलमडली होती.

पुणे : प्राप्तिकर विवरण (आयटी रिटर्न्स) भरण्याचा सोमवार शेवटा दिवस असल्याने अनेकांची सकाळपासूनच धांदल उडाली होती. मात्र, प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ सकाळी दहा वाजल्यापासून डाऊन झाल्यामुळे विवरण भरण्याची प्रक्रियाच कोलमडली होती.अनेकांनी आॅनलाईन विवरण भरण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांनी सीएंना आपले विवरण भरण्यास सांगितले होते. देशभरामधून संकेतस्थळावर अनेकांनी प्रयत्न केल्याने सर्व्हरवर ताण आला होता. संध्याकाळपर्यंत हे संकेतस्थळ डाऊन असल्यामुळे नागरिक विवरण भरु शकले नाहीत. विवरण भरण्याची मुदत ५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.अर्थ मंत्रालयाने प्राप्तिकर विवरण दाखल करण्यासाठी ३१ जुलैची मुदत दिली होती. यंदा विवरण दाखल करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, शहरातील आधार कार्ड केंद्र बंद असल्याने आणि सुरु असलेल्या केंद्रांवरील सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना वेळेत आधार काढून घेता आले नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत विवरण भरण्यासाठी धावपळ सुरु होती.विशेष म्हणजे केंद्र शासनाने ही मुदत वाढवून दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. एरवी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष उभा करुन विवरण दाखल करुन घेतले जाते. मात्र, अलिकडील काळामध्ये आॅनलाईन रिटर्न्स भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे करदाते वैयक्तिक विवरण स्वत:च दाखल करतात. यासोबतच सीएंकडून आपले विवरण दाखल करुन घेतात. पॅन कार्डला आधार कार्ड जोडण्याच्याही सुचना प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना देण्यात आलेल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ व्यवस्थित चालत होते. मात्र, दहा वाजता संकेतस्थळ डाऊन झाले.