शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या विशेषाधिकारात मिळकतकरात सवलत

By admin | Updated: January 9, 2017 03:16 IST

मिळकतकर आॅनलाइन भरल्यास त्या रकमेवर ५ टक्के सवलत देण्याचा आयुक्तांनी मांडलेला प्रस्ताव मुख्य सभेने मार्च २०१७ पर्यंत पुढे ढकलला होता.

पुणे : मिळकतकर आॅनलाइन भरल्यास त्या रकमेवर ५ टक्के सवलत देण्याचा आयुक्तांनी मांडलेला प्रस्ताव मुख्य सभेने मार्च २०१७ पर्यंत पुढे ढकलला होता. मात्र आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करून ३१ मार्च २०१७ पर्यंत आॅनलाइन मिळकतकराची रक्कम भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ११ जानेवारीपासून पुणेकरांना ही सवलत उपलब्ध होणार आहे.नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्राकडून कॅशलेस व्यवहारांवर सवलत देण्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनीही मिळकत कराचा आॅनलाइन भरणा करणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर मांडला होता. मात्र मुख्य सभेमध्ये हा प्रस्ताव मार्च २०१७ च्या कार्यपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयुक्तांनी मार्चची वाट न पाहता त्यांचा विशेषाधिकार वापरून ही योजना लागू केली आहे.महाराष्ट्र मनपा अधिनियम परिशिष्ट ८ नियम ५१ अन्वये शास्ती, फी किंवा वसुलीचा खर्च पूर्णत: किंवा अंशत: माफ करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना आहे. त्याआधारे मिळकतकराच्या थकबाकीची रक्कम एकरकमी आॅनलाइन भरल्यास ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मिळकतकर विभागाने आॅनलाइन पद्धतीने जास्तीत जास्त कर जमा व्हावा, यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन लाखांपेक्षा जास्त मिळकतदारांनी आॅनलाइन कराचा भरणा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ६८ टक्के इतक्या प्रमाणात वाढले आहे. प्रशासनाकडे आॅनलाइनद्वारे १८२ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.