शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनची गाडी नसतानाच केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: January 4, 2017 05:30 IST

कोंढवा अग्निशमन केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या केंद्रासाठी फायर गाडी तसेच मनुष्यबळच उपलब्ध

पुणे : कोंढवा अग्निशमन केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या केंद्रासाठी फायर गाडी तसेच मनुष्यबळच उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्राचे उद्घाटन हा केवळ दिखावा ठरला असल्याची जोरदार टीका मंगळवारी नगरसेवकांनी मुख्य सभेत केली.कोंढवा येथील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर या केंद्राला गाडी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. त्यानंतर ६ दिवसांनी तिथल्या एका बेकरीला आग लागून ६ कामगारांचा मृत्यू झाला. या केंद्रामध्ये गाडी उपलब्ध असती तर ही घटना टाळता आली असती. पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसताना उद्घाटनाची घाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्य सभेत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली.मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले, ‘‘अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी असून, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.’’प्रशासनाच्या खुलाशानंतर नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. जर नवीन केंद्र सुरू करण्यासाठी मनुष्यबळ व फायर गाडी उपलब्ध नव्हती तर कोंढवा येथील केंद्राचे उद्घाटन करून दिखावा करण्याचा घाट का घालण्यात आला? अग्निशमन केंद्रासाठी कोणतीही मान्यता घेण्यात आली नसताना मुख्यमंत्री उद्घाटनासाठी का आले? यासाठी कोणाकडून घाई करण्यात आली? अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘कोंढव्यातील जागा अग्निशमन केंद्रासाठी राखीव असल्याने पालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आली. पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.’’ (प्रतिनिधी)