शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

पुस्तकामुळे मन, बुद्धी श्रीमंत होते : इंदुमती जोंधळे; बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 16:08 IST

पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देमिलिंद जोशी यांच्या हस्ते बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन बुद्धी इतकाच भावनांचा विकासही महत्त्वाचा, त्यासाठी साहित्याचे वाचन : प्रमोद शिंदे

पुणे :  जे जे चांगले आहे ते ते टिप कागदासारखे टिपून घ्या. छोट्या संकटांनी निराश होऊ नका. आयुष्य सुंदर आहे ते भरभरून आणि समरसून जगायला शिका पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पिंपरी-चिंचवड आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने आयोजित चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी खेडचे आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष मंगला गोरे, मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, समन्वयक अजित फाफाळे, मसापच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे, मसापचे कार्यवाह बंडा जोशी, लेखक राजीव तांबे, एकनाथ आव्हाड, वर्षा तोडमल उपस्थित होते. ढोल, लेझीम आणि ताश्यांच्या गजरात निघालेल्या शानदार ग्रंथदिंडीने या संमेलनाचा प्रारंभ झाला. जोंधळे म्हणाल्या, की जवळच्या माणसांचे मन ओळखा. पुस्तका बरोबर माणसांचे मन वाचायला शिका.या जगात अशक्य काहीच नाही. आत्मशक्तीच्या बळावर आपली स्वप्ने पूर्ण करता येतात. आपली वाट आपण निर्माण करा. चांगला माणूस होणे हेच श्रेष्ठ ध्येय आहे.जोशी म्हणाले, की ग्रामीण भागातील मुलांपर्यंत साहित्य चळवळ घेऊन जाण्यासाठी साहित्य परिषदेने शाखांच्या माध्यमातून तिथे बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचे ठरविले आहे. उद्याच्या वाचन संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा बालकुमारांच्या मनात साहित्याचे प्रेम निर्माण होण्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतील. प्रमोद शिंदे म्हणाले, की व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनविण्यासाठी साहित्य निश्चित उपयुक्त ठरेल. बुद्धी इतकाच भावनांचा विकासही महत्त्वाचा आहे त्यासाठी साहित्याचे वाचन करा.यावेळी राजन लाखे, नगराध्यक्ष मंगला गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. विनोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्षा तोडमल यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रानंतर लेखक राजीव तांबे यांच्या कथाकथनाला, बंडा जोशी यांच्या हास्य कवितांना आणि कवी एकनाथ आव्हाड यांच्या काव्यवाचनाला बालकुमारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदChakanचाकणMilind Joshiमिलिंद जोशी