शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे उद्घाटन, खादी उद्योगाला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 06:13 IST

खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे.

पुणे : खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे. यासंदर्भातील योजना तयार करून महसूल विभागाकडील व पालिका हद्दीतील जागेवर अधिकाधिक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यातून महाखादी हा बँ्रड केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रमुख ब्रँड म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या महाखादी विक्री केंद्राच्या आणि ग्रामीण कारागीर संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, महेश लांडगे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, की ग्रामीण अर्थव्यवस्थेची सुधारणा करण्यासाठी बारा बलुतेदारांचे गुण जोपासण्याची गरज आहे. त्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकत नाही. त्यामुळेच विशाल चोरडिया यांनी या वस्तूंचे योग्य मार्केटिंग केले आहे. खासदार अनिल शिरोळे यांनी खासदार निधीतून महाखादीसाठी निधी दिला. सर्व खासदारांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे, असे नमूद करून फडणवीस म्हणाले, राज्यातील लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांना एक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी पत्र लिहिणार आहे.

टॅग्स :KhadiखादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस