पुणे : इंडियन नॅशनल अॅकॅडमी आॅफ इंजिनिअरिंग (आय.एन.ए.ई.) या प्रतिष्ठित संस्थेचे वार्षिक अधिवेशन डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डी.आय.ए.टी.) येथे झाला.राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवरील कार्यशाळा, परिसंवाद, सभा, परिषदांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजन करणे, तांत्रिक आणि व्यावसायिकदृष्ट्या भविष्यातील उपयोगी अशा महत्त्वाच्या विषयांवर संशोधनात्मक कार्यास प्रोत्साहन देणे, त्याचा दस्तावेज करून सरकार दरबारी त्याची योग्य ती शिफारस करणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. निर्णायक आणि महत्त्वाच्या तांत्रिक विषयांवरील सरकारी धोरणांवर आपले मत देणे आणि योग्य ते सहकार्य देणे, हे कार्य देखील आय.एन.ए.ई. संस्था करते. वरील कार्याच्या अनुषंगाने या संस्थेने चार वेगवेगळे शैक्षणिक मंच स्थापन केले आहेत. आय.एन.ए.ई. फोरम आॅन इंजिनिअरिंग एज्युकेशन, आय.एन.ए.ई. फोरम आॅन एनर्जी, आय.एन.ए.ई. फोरम आॅन टेक्नॉलॉजी फोरसाइट अँड मॅनजमेंट, आय.एन.ए.ई. फोरम आॅन इंजिनिअरिंग इंटरव्हेनशन फॉर डिझास्टर मिटिगेशन.अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांची आणि अभियांत्रिकी जगताची उन्नती साधणे, जागतिक स्तरावर आपली प्रगती संस्थेचे महत्त्वाचे कार्य आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व आय.एन.ए.ई. ही भारतीय संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील या विषयात कार्य करणाऱ्या सी.ए.ई.टी.एस. या संस्थेवर करीत आहे.जे. एस. डब्ल्यू. स्टीलचे अध्यक्ष सज्जन जिंदाल हे या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आय.एन.ए.ई. या प्रतिष्ठित संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात भारतीय अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती सर्वांना भारावून गेली.(प्रतिनिधी)
आयएनएईचे वार्षिक अधिवेशन
By admin | Updated: December 11, 2015 00:59 IST