शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेत झाली सुधारणा

By admin | Updated: February 1, 2016 00:34 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीची भांडाफोड ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केली

पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीची भांडाफोड ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांमध्ये बदल घडून आले असून, लोकमतच्या वृत्ताचा चांगला परिणाम पिंपरीतील मोरवाडी चौक, इंदिरा गांधी उड्डाणपूल, तसेच चिंचवड येथील छत्रपती शिवाजी चौकात दिसून येत आहे. वाहतूक पोलीस नेमक्या ठिकाणी उभे राहत आहेत, तर वाहनचालकही नियमांचे पालन करीत असल्याचे दृश्य दोन दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. प्रमुख चौकांमध्ये ज्या ठिकाणी न थांबता आडबाजूला थांबून नियम तोडून येणाऱ्या वाहनचालकाला अडवायचे. वाहन परवाना, कागदपत्रांची मागणी करायची, काही तरी कमतरता दाखवून दंडाची पावती फाडायची असे वाहतूक पोलिसांचे प्रताप सुरू असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने विशद केली. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच नियमानुसार काम करावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून चिंचवड आणि पिंपरीतील चौकांमध्ये अमूलाग्र बदल घडून आले आहेत. चिंचवड, तसेच मोरवाडी चौकात मध्येच थांबणाऱ्या रिक्षा नव्हत्या. पोलीस रस्त्याच्या बाजूला वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच थांबले होते. घोळक्याने थांबलेले पोलीस हे नेहमीचे चित्र बदलले होते. आवश्यक तेवढेच पोलीस त्या चौकात अशी परिस्थिती विविध चौकांमध्ये पहावयास मिळत आहे. नाहक कोणालाही अडवणूक केली जात नाही. कोणीतरी वाहनचालक नियमाचे उल्लंघन करेल, आपल्या जाळ्यात अडकेल, या भावनेने काम न करता प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्थापनाचे काम करताना पोलीस दिसून आले. अवघ्या दोन दिवसांत अनुभवास आलेल्या या सकारात्मक अनुभवाबद्दल नागरिकांनी लोकमतचे आभार मानले. (प्रतिनिधी)