शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क नियंत्रण कायद्यात होणार सुधारणा

By admin | Updated: May 7, 2017 03:33 IST

शुल्क नियंत्रण कायद्यातील उणिवा तपासून त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती शुल्कवाढीवरील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शुल्क नियंत्रण कायद्यातील उणिवा तपासून त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती शुल्कवाढीवरील तक्रारींचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्याबाबतचा अहवाल पुढील पंधरा दिवसांत सादर करणार आहे. त्यामुळे शाळांकडून वाढविल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कवाढीला आळा बसणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम म्हणजे शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी डिसेंबर २०१४ पासून करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार विभागीय शुल्क नियंत्रण समिती व पुनरिक्षण समितीही वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आल्या आहेत. या कायद्यांतर्गत शिक्षणाधिकारी, तसेच विभागीय समितीकडे शुल्कवाढीसंदर्भात पालकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार वैयक्तिक पालकांना विभागीय समितीकडे तक्रार करता येत नाही. शाळेतील शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारी समितीने शुल्कवाढ नाकारल्यास व्यवस्थापनालाच विभागीय समितीकडे तक्रार करता येते. पालक कार्यकारी समितीकडे आपली तक्रार करू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर पालक संघटनांच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक पालकही शुल्कवाढीसंदर्भात तक्रार करू शकतात. या मुद्यावर पुण्यात अधिकारी व पालकांमध्ये अनेकदा वादावादीही झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी राज्य शासनाच्या विधी विभागाचा सल्ला घेऊन पालकांच्या तक्रारींवर निर्णय घेण्याचे आश्वासन पालकांना दिले आहे. कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत आलेल्या तक्रारींचा विचार करून राज्य शासनाने कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पुनरिक्षण समितीचे अध्यक्ष व्ही. जी. पळशीकर या समितीचे अध्यक्ष असतील, तर मुंबईच्या विभागीय शुल्क नियंत्रण समितीचे सदस्य कृष्णप्रसाद रामचंद्र वॅरिअर, मोहन आवटे, प्राथमिक शिक्षण संचालक, मुंबईचे विभागीय उपसंचालक, विधी व न्याय विभागाचे सहसचिव, दोन शाळांचे प्रतिनिधी, दोन पालक प्रतिनिधी समितीचे सदस्य असतील, तर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.शुल्कवाढीसंदर्भात प्राप्त झालेल्या विविध तक्रारींचा ही समिती अभ्यास करणार आहे. या तक्रारींसह शैक्षणिक धोरण व कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कायद्यात आवश्यक सुधारणा सुचविल्या जाणार आहेत. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.