शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गुणांत तफावत असल्यास सुधारणा करा

By admin | Updated: March 21, 2017 05:11 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना देण्यात येणाऱ्या गुणांत मोठी तफावत दिसते. या प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्यास आयोगाने त्याचा विचार करायला हवा, असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले. ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’तर्फे आयोजित राज्य सेवा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.याप्रसंगी युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, नरेंद्र कुलकर्णी, मनोहर भोळे, नागेश गव्हाणे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, एमपीएससी परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, हे कुणालाच माहिती नसते. यूपीएससी व सेना दलात तुम्हाला किती गुण मिळाले, त्यापेक्षा मुलाखतीला तुम्ही कशा प्रकारे सामोरे गेलात, त्यावरून गुण निश्चित केले जातात. त्याचप्रमाणे एमपीएससीमध्ये पद्धत आहे. परंतु, तहसीलदार म्हणून निवड झालेल्या श्रीकांत निळेने मुलाखतीत पॅनेलकडून दिल्या जाणाऱ्या गुणपद्धतीवर शंका उपस्थित केली. तुकाराम जाधव म्हणाले, स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळू शकते, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अ‍ॅकॅडमीतर्फे केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते. (प्रतिनिधी)