शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

छाप्याचा गवगवा, हाती धुपाटणे

By admin | Updated: October 22, 2015 03:00 IST

साठेबाजांच्या तपासणीसाठी तूरडाळ आणि तेल व्यापाऱ्यांवर शहर अन्न धान्यपुरवठा विभागाने घातलेल्या छाप्यात ९४ घाऊक व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

पुणे : साठेबाजांच्या तपासणीसाठी तूरडाळ आणि तेल व्यापाऱ्यांवर शहर अन्न धान्यपुरवठा विभागाने घातलेल्या छाप्यात ९४ घाऊक व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. रात्रंदिवस केलेल्या या कारवाईचा गवगवाच जास्त झाला, पण त्यातून काहीही निष्पन्न न होता प्रशासनाच्या हाती केवळ धुपाटणे आले़ मार्केट यार्ड, भवानी पेठ आणि जिल्ह्यातील ९४ ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांचे साठे तपासण्यात आले. या कारवाईसाठी प्रशासनाने रात्री दुकाने बंद झाल्यानंतर ती सील केली गेली़ अचानक झालेल्या या कारवाईचा व्यापारी संघटनांनी निषेध केला़ मात्र, पुणे शहरात कोणत्याही व्यापाऱ्याकडे मर्यादेपेक्षा अधिक साठा असल्याचे आढळून आले नाही़ जिल्ह्यात भोर तालुक्यात सोयाबीनची ३२० पोती आणि टरफले असलेल्या शेंगाची ७२ पोती आढळून आली तर नसरापूरमध्ये एका दुकानात ५ हजार ८९५ लिटर तेलाचा साठा आढळून आला. भोर तहसीलदारांनी बेकायदा साठा केल्याप्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योेती कदम यांनी सांगितले. जिल्ह्यात कोठेही डाळीचा मर्यादा ओलांडून साठा आढळून आला नाही. १४५ घाऊक व्यापारी असून उर्वरित तपासणीचे काम सुरूच राहणार असल्याचे शहर अन्न धान्य पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले. पुरवठा विभागाने ६ पथकांमार्फत गेली दोन दिवस डाळ आणि तेल व्यापाऱ्यांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. ५१ दुकानांच्या तपासण्या अद्याप व्हायच्या आहेत.