शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बजेटची प्रभावी अंमलबजावणी करा

By admin | Updated: May 22, 2017 04:57 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकाची प्रभावी आणि शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी पुढाकार घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकाची प्रभावी आणि शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी पुढाकार घेतला आहे. सावळे यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वपक्षीय नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागातील कामांसाठी केलेली तरतूद आणि ते खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुरू असलेल्या नियोजनाबाबत त्यांनी व नगरसेवकांनी चर्चा केली. सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांची माहिती देण्यात आली. स्थायीच्या अध्यक्षा सावळे यांनी होणाऱ्या कामांनाच प्राधान्य देण्याचे तसेच कामांची निविदा प्रक्रिया ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेचे अंदाजपत्रक दर वर्षी तयार केले जाते. त्यामध्ये विविध विकासकामांची तरतूद असते. मात्र, दर वर्षी ४० टक्के अंदाजपत्रक खर्च होत नाही. अंदाजपत्रकात कामांची तरतूद करूनही नियोजनाअभावी ती मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यातच निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक नवीन आहेत. या नवीन नगरसेवकांना प्रभागातील कोणत्या कामांचा अंदाजपत्रकात समावेश केला आहे, याची पूर्ण माहिती व्हावी, यासाठी सावळे यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वपक्षीय नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकांद्वारे सावळे यांनी अंदाजपत्रकाची प्रभावी आणि शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी यासाठी नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रीय कार्यालयनिहाय झालेल्या बैठकांमध्ये कोणत्या विकासकामांचा उल्लेख आहे आणि त्यासाठी किती रक्कमेची तरतूद केली आहे, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचे संबंधित प्रभागाच्या चारही नगरसेवकांना सादरीकरण केले. अंदाजपत्रकातील कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अपेक्षा व्यक्त केली.