शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

यवतच्या सरपंचांवर तोतयागिरीचा गुन्हा

By admin | Updated: January 25, 2016 00:58 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात सह्यांचा वापर केल्याने सरपंच रजिया अजमुद्दीन तांबोळी यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला आहे.

यवत : जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात सह्यांचा वापर केल्याने सरपंच रजिया अजमुद्दीन तांबोळी यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला आहे.याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्या मनीषा सचिन बधे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : यवत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर असलेल्या रजिया तांबोळी यांना अपर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कारणावरून अपात्र ठरविले होते. त्यांच्याविरोधात गावातील रोहन कैलास दोरगे व अशोक जांबले यांनी २५ आॅगस्ट २०१५ रोजी सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता.या प्रकरणात सुनावणी होऊन दि. २३ डिसेंबर २०१५ रोजी अपर जिल्हाधिकारी यांनी यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संपत वाबळे यांना सरपंच रजिया तांबोळी यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आल्याबाबतचे पत्र पारित केले होते, तर या पत्राची प्रत सरपंच रजिया तांबोळी यांना दि. २४ डिसेंबर २०१५ रोजी आदा करण्यात आली होती. तरीही त्यांनी सह्यांचे अधिकार वापरून ग्रामपंचायत कारभार सुरू ठेवला होता. दि. १४ जानेवारी २०१६ रोजी ग्रामपंचायतीच्या सभेचे सूचनापत्र रजिया तांबोळी यांनी त्यांच्या व ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीनिशी पाठवले होते.मनीषा बधे यांनी तक्रार दिल्यानंतर भा.द.वि. कलम १७0 अन्वये तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. एस. वाघ करीत आहेत. (वार्ताहार)