शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन

By admin | Updated: September 29, 2015 02:18 IST

अखिल तांदुळवाडीवेस तरुण मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराजांचे अभंग, ओव्या व पर्यावरणाचा संदेश देत जनहित प्रतिष्ठान शाळेचे ढोल व लेझीम पथक

झाडे लावा, झाडे जगवा’चा पर्यावरणजागृतीचा संदेश देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुलालविरहित गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. बारामती शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत ९३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली. कारवाईच्या इशाऱ्यामुळे शहरात यंदादेखील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर केला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री साडेअकरापर्यंत सुरू होत्या. यंदा नीरा डाव्या कालव्यात पाणी नसल्याने प्रथमच कृ त्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यात आले.बारामती : अखिल तांदुळवाडीवेस तरुण मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराजांचे अभंग, ओव्या व पर्यावरणाचा संदेश देत जनहित प्रतिष्ठान शाळेचे ढोल व लेझीम पथक, पर्यावरण पथक आदी सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील भागवत, उपाध्यक्ष श्रीकांत गायकवाड, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, सचिव अमोल बोधे, नगरसेवक, श्याम इंगळे, नारायण सिकची, किरण इंगळे, जयसिंग पवार, राजेश मेहता, रमेश पंजाबी, अरुणदादा नलवडे, राजेश जाधव, सचिन पवार उपस्थित होते. फुलांच्या पाकळ््यांचा वापर करण्यात आला.कसबा येथील काशीविश्वेश्वर तरुण मंडळाचा साध्या पद्धतीने गणपती विसर्जन सोहळा पार पडला. एक तास चाललेल्या मिरवणुकीत धों. आ. सातव शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचा समावेश होता. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, सचिन सातव, सूरज सातव, दत्तात्रय सातव आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलची विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सनई चौघड्याने या मिरवणुकीची सुरुवात झाली. या मंडळाची पालखीत गणपती ठेवून काढलेली मिरवणूक, तसेच मिरवणुकीतील मर्दानी खेळ, ढोल-लेझीम पथक, उंट, घोड्यांचा सहभाग नागरिकांच्या कौतुकाचा विषय होता.अध्यक्ष किरण गुजर, उपाध्यक्ष प्रदीप परकाळे, सचिव अ‍ॅड. अमर महाडिक या वेळी उपस्थित होते. मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक बाह्य मार्गाने वळवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० पोलीस अधिकारी, २९० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. शहरात खंडोबानगर, कसबा, मोतीबाग चौक, भिगवण रस्ता या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक संघ, तीन हत्ती चौक, दत्त मंदिर, तुपे बंगला, परकाळे बंगला, गरुडबाग, माळावरची देवी मंदिर या ठिकाणी जलकुंभ ठेवण्यात आले होते.मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आरत्या होत्या. तसेच, नगरपालिकेच्या वतीने गांधी चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. प्रांताधिकारी संतोष जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, नगरसेविका यास्मीन बागवान, नगरसेवक सुभाष ढोले, सुनील सस्ते, मुख्य अधिकारी नीलेश देशमुख, नगरपालिकेचे खातेप्रमुख, कर्मचारी, नगरसेवक, नगरसेविका आदींनी येणाऱ्या गणेश मंडळांचे स्वागत केले. शहरातील मानाचा पहिला गणपती अखिल मंडई मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, जय जवान गणेशोत्सव मंडळ, अखिल महावीर पथ मंडळ, जय जवान तरुण मंडळ, आझाद तरुण गणपती मंडळ, मारवाडपेठ तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ, नवरत्न तरुण मंडळ, नटराज तरुण मंडळ, एसटी कामगार संघटना गणेश मंडळ, श्रीराम गणेशोत्सव तरुण मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, सन्मित्र तरुण मंडळ आदी मंडळांनी साधेपणाने गणेश विसर्जन केले.