शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात विसर्जन; मानाच्या गणरायांची मिरवणूक ९ तास चालली 

By श्रीकिशन काळे | Updated: September 28, 2023 20:53 IST

यंदा गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात, आनंदात निघाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि वरुणराजाच्या साक्षीने पुण्यातील पाचही मानाच्या गणरायांचे हौदात विसर्जन करण्यात आले. सकाळी १० वाजता मिरवणूक सुरू झाली होती आणि पाचही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला ९ तास लागले. विसर्जन मिरवणुकीत वरूणराजाने सायंकाळी ४ वाजता हजेरी लावली, तरी देखील गणेश भक्तांची गर्दी कमी झाली नाही. 

 यंदा गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात, आनंदात निघाली आहे. ढोलताशांचा गजर, बाप्पा मोरयाचा जयघोष, सुरेल नगारावादन, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, देखाव्यातून इतिहासाची जागृती करण्यात आली. पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची देदीप्यमान परंपरा पुणेकरांना अनुभवायला मिळत आहे. आता पाच मानाच्या गणरायांचे विसर्जन झाले असून, प्रमुख मंडळांची मिरवणूक पहायला मिळत आहे. 

 सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची आरती केली. गणरायाची आरती करून मानाच्या आणि मुख्य गणपतींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली. चांदीच्या पालखीतून, फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादन, बँडची सुरावट ऐकायला मिळाली. तसेच, रांगोळीच्या पायघड्याही मिरवणूक मार्गांवर घालण्यात आल्या होत्या. 

मानाचा पहिला : कसबा गणपती गणरायाची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली. सकाळी उत्सव मंडपातून विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याकडे आली. आरती झाल्यावर मिरवणुकीमध्ये नगारखाना, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचे पथके सहभागी झाली होती. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळाला. मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरून पालखी घेऊन पुढे सरकत होते. अतिशय वैभवशाली अशी ही मिरवणूक पहायला मिळाली. 

मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

सकाळी नऊ वाजता उत्सव मंडपासून श्री गणरायाची मूर्ती पालखीत विराजमान झाली. सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये पारंपरिक पोशाखात अश्वारूढ कार्यकर्ते हे आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. यंदा सतीश आढाव यांचे नगारावादन, समर्थ प्रतिष्ठान, ताल ढोल-ताशा पथकांचे वादन होते. पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाल्याने मिरवणूकीचे वैभव आणखी वाढले. विष्णुनादचे कार्यकर्ते पालखीपुढे शंखनाद करत होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ तयार केला होता. यंदा प्रथमच न्यू गंधर्व ब्रास बँडचे वादक हनुमान चालिसा आणि मंगल अमंगल हरी ही रामायण चौपाई वाजविण्यात आली.  

मानाचा तिसरा : श्री गुरुजी तालीम मंडळ

अतिशय नयनरम्य अशा जय श्रीराम ‘रामराज्य’ या फुलांच्या आकर्षक रथात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान झाली होती. प्रत्येकाचे लक्ष हा रथ वेधून घेत होता. स्वप्निल व सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी हा रथ तयार केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगाव) यांचे प्रात्यक्षिके व ढोल-ताशा पथकांचे वादनाने भाविक दंग होऊन गेले. नादब्रह्म ढोल-ताशा पथक आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथकाच्या निनादाने अवघा आसमंत दुमदुमून गेला.  

मानाचा चौथा : श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट

यंदा गणपतीची मिरवणूक महाकाल रथातून निघाली. रथाचे वैभव काही औरच होते. हा रथ 28 फूट उंच असून, फुलांनी सजविलेली 12 फूट उंचीची श्री महाकालची पिंड प्रमुख आकर्षण होते. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. लकडी पुलावर त्याचा वापर करण्यात आला. पुष्पसजावटकार सरपाले बंधूंनी रथाची सजावट केली होती. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी उज्जैनवरून खास अघोरी महाराज यांना बोलावले होते. तसेच, बाहुबली महादेव हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते. मिरवणुकीत अग्रस्थानी लोणकर बंधूंचा नगारावादनाचा गाडा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, शिवप्रताप वाद्य पथक सहभागी झाली होती.  

मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती

केसरीवाडा गणपती दुपारी दीड वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आला. तिथे रोहित टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत श्रीगणेश मूर्ती विराजमान होते. मिरवणुकीत गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक हे सहभागी झाले होते. बिडवे बंधूंच्या नगारावादनासह मिरवणुकीत शिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन पुणेकरांना ऐकायला मिळाले. इतिहासप्रेमी मंडळाकडून चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक हा देखावाही मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हा जीवंत देखावा सादर करण्यात आला होता. रॅंडचा वध करण्यात चापेकर बंधूंना लोकमान्य टिळक यांनी प्रेरणा दिली होती. त्यांचा हा देखावा सादर केला होता. 

1) कसबा गणपती       16:10 विसर्जन

2) तांबडी जोगेश्वरी गणपती        16:43 विसर्जन         3) गुरुजी तालीम गणपती          17:40 विसर्जन

4) तुळशीबाग गणपती           18:32 विसर्जन

५) केसरीवाडा७.०० विसर्जन

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सव