शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कचरा आढळल्यास तत्काळ कळवा, शिरूर नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छता अभियानाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:42 IST

शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे.

शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर कच-याचे फोटो टाकले जात असून, त्याचा निपटारा केल्याचे फोटोही कर्मचारी टाकताना दिसत आहेत.‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरूर नगर परिषदेने यात पूर्ण पारदर्शकता ठेवत शहरातील सत्ताधारी, विरोधक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांना या मोहिमेत सामावून घेतले. सोशल मीडियावर (व्हॉट्स अ‍ॅप) या सर्व घटकांचा एक ग्रुप तयार केला. यात सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्वच्छता सभापती सचिन धारिवाल व मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी शहरात कुठे कचरा आढळल्यास तत्काळ त्याचा फोटो गु्रपवर टाकण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पथक तयार करून शहरातील सर्व भाग स्वच्छतेसाठी पिंजून काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचा प्रचंड सकारात्मक परिणाम जाणवला. ग्रुपवर शहरातील काही भागांतील कचरा असलेले फोटो टाकण्यात आले. त्याचा त्वरित निपटारा करण्यात येऊन कर्मचा-यांनीच तो कचरा उचलल्याचे, परिसर स्वच्छ केल्याचे फोटोही टाकले. गेली चार दिवसांपासून अशा प्रकारे अभियानाला गती प्राप्त झाली असून, अशा पद्धतीने नगर परिषद व नागरिकांमध्ये समन्वय राहिल्यास शहर कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही असे दिसते.>तत्काळ दखल : कच-याचे वर्गीकरणग्रुपमुळे शहरातील कानाकोप-यात असणा-या कच-याची माहिती उपलब्ध होत असून, त्याच्यावर तत्काळ कार्यवाही होतानाचे चित्र आहे. वास्तविक शहरात स्वच्छतेच्या कायमस्वरूपी नियोजनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा उचलण्यासाठी नागरिकांना दोन डस्टबिन मोफत वाटप करण्यात आले आहे. या डस्टबिनमध्ये एकात ओला व दुसºयात सुका कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले. घंटागाड्यांतही ओला व सुका कचºयासाठी स्वतंत्र जागा करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक घंटागाड्यांची वाट न पाहता दिसेल तिथे कचरा टाकताना दिसतात. अनेक नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. नगर परिषदेने जर नागरिकांना सामावून घेऊन स्वच्छता अभियानाला गती दिली असेल तर नागरिकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.