शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा हस्तांतर शुल्क; सहकार खात्याची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कायद्याचा चुकीचा अर्थ लावून सोसायटी सदस्यांकडून बेकायदेशीरपणे हस्तांतरण शुल्क व अन्य रक्कम वसूल केल्याबद्दल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कायद्याचा चुकीचा अर्थ लावून सोसायटी सदस्यांकडून बेकायदेशीरपणे हस्तांतरण शुल्क व अन्य रक्कम वसूल केल्याबद्दल सहकार उपनिबंधकांनी धनकवडी येथील सत्यसाईनगर सहकारी गृहरचना संस्थेवर संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली. त्याचबरोबर सदस्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेली सर्व रक्कम परत करावी, असाही आदेश दिला. त्याचे पालन केले नाही म्हणून संबंधित अर्जदाराने परत तक्रार केल्यानंतर संचालक मंडळाला रोज १०० रुपये याप्रमाणे दंडही ठोठावला.

विजय रा. कोतवाल यांनी यासंदर्भात सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यांनी या सोसायटीतील एक सदनिका थेट विकसकाकडून खरेदी केली. अशी खरेदी झाली तर हस्तांतरण शुल्क घेण्याचा काही प्रश्नच येत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, सोसायटीने ते अमान्य करून कोतवाल यांच्याकडून हस्तांतरण शुल्क म्हणून २० हजार रुपये घेतले. सभासद शुल्क ५०० रुपये असताना २ हजार ५०० रुपये आकारले. कोतवाल यांनी सदनिका खरेदी करण्यापूर्वी रंग व कन्वेन्स डीड करण्याकरिता सोसायटीने आकारलेले ५ हजार रुपये शुल्क त्यांनी द्यावे म्हणूनही सोसायटीने त्यांच्याकडे मागणी केली. कोतवाल यांनी हस्तांतरण शुल्क, सभासद शुल्क जमा करून त्याच्या पावत्या घेतल्या.

नंतर, त्यांनी या सर्व गोष्टींच्या विरोधात सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. हस्तांतरण शुल्क व सदस्य शुल्क आकारणी बेकायदा आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावरून उपनिबंधक कार्यालयाने सोसायटीला नोटीस पाठवली व त्यांचे म्हणणे मागवले. सोसायटीच्या बैठकीत हस्तांतरण शुल्क व सभासद शुल्क याबाबत ठराव झाला असल्याचा युक्तिवाद सोसायटीने केला. तो अमान्य केला व कायद्यानुसार विकसकाकडून खरेदी झाल्यास हस्तांतरण शुल्क आकारता येत नाही, सदस्य शुल्क ५०० रुपयेच असावे, असे कार्यालयाने स्पष्ट केले व सोसायटीने कोतवाल यांना पैसे परत द्यावेत असा आदेश दिला, त्यासाठी मुदतही दिली.