शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाहतूक

By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST

पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक येत्या दोन दिवसांत पूर्णपणे

लोणी काळभोर : पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक येत्या दोन दिवसांत पूर्णपणे न थांबल्यास २५ मार्चपासून सहा आसनी रिक्षाचालक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चिंतामणी सहा आसनी रिक्षा संघाचे अध्यक्ष व पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल झेंडे यांनी पोलीस खात्याला दिला आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना झेंडे म्हणाले, की सध्या हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या आणी स्कॅ्रप झालेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहा आसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहनांमध्ये पोलीस व त्यांच्या नातलगांची वाहने असल्याने त्यांना वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद आहे. सहा आसनी रिक्षाचालकांवर कारण नसताना कारवाई होत असल्याने वाहतुकीचा कायदेशीर परवाना असूनही या सहा आसनी रिक्षाचालकांना व्यवसाय करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.आज सर्व सहा आसनी रिक्षाचालक निवेदन देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले होते. आज त्यांनी रिक्षा रस्त्यांवर न उतरवता लोणी काळभोर बाजार मैदानांवर लावल्या होत्या; परंतु हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मँजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या आणी स्क्रॅप झालेल्या पॅगो रिक्षा तसेच जिल्ह्याबाहेरील सहा आसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक मात्र विनाव्यत्यय सुरू होती. प्रवाशांचे विशेषत: महिला, लहान मुले व वृद्धांना प्रवासासाठी पर्याय शोधावा लागल्याने हाल झाले. (वार्ताहर)> सध्या रासरोसपणे विनापरवाना होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद व्हावी व सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय मिळावा याकरिता रिक्षा संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, परिवहन विभाग, वाहतूक शाखा हडपसर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना एका निवेदनाद्वारे सदर अवैध प्रवासी वाहतूक २५ मार्चपर्यंत कायमस्वरूपी बंद न झाल्यास सर्व सहा आसनी रिक्षाचालक आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.