शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळू वाहतूक रोखणारच

By admin | Updated: February 17, 2016 01:33 IST

वाळू वाहतूकदारांनी केलेल्या आंदोलनामुळे बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच यवत पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल

यवत : वाळू वाहतूकदारांनी केलेल्या आंदोलनामुळे बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच यवत पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल ३६ ट्रक पकडले. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदाजे ७५ लाख रुपयांचा दंड केला जाणार आहे. कसलाही शासकीय कर भरल्याच्या पावत्या नसताना बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करून परत कारवाई झाल्यास दबावतंत्राचा वापर करणे चुकीचे असून कारवाई सुरूच राहणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यवत पोलीस, दौंड महसूल विभाग व पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संयुक्त ही कारवाई करण्यात आली. रविवारी (दि. १४) यवत पोलीस स्टेशनमध्ये पुणे व सोलापूर वाळू वाहतूकदार संघर्ष समिती व पोलिसांमध्ये वाळू वाहतुकीच्या ट्रकवर कारवाई केल्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावरून परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप झाल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते.यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण कारवाईवर ठाम राहिले आणि बेकायदेशीर धंदे करून दहशत निर्माण करून दबाव टाकत असल्यास सहन केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस खात्यामधील पैशाच्या वाढत्या हव्यासापायी वाळू वाहतूकदार यांना वेठीस धरले जात असल्याचे सांगत परत आंदोलनाचा इशारा दिला होता.दरम्यान, काल (दि. १५) बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करीत चांगलाच दणका दिला. महसूल विभागाचे पुरंदर उपविभाग प्रांत समीर शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके, मंडल अधिकारी ज्ञानदेव यादव, गिरीश भालेराव, तलाठी रवींद्र होले, किशोर परदेशी, स्नेहा कांबळे, बजरंग सोनवणे, जगताप यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.रात्रभर कारवाई करीत ३६ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेतले. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी भेट देत पाहणी केली.दरम्यान, सकाळपासून महसूल विभागाने संबंधित ट्रकमधील वाळूबाबत खातरजमा करून प्रतिब्रासला ५३ हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात असलेल्या ३६ ट्रकमधून सुमारे १४४ ब्रास वाळूचे अंदाजे ७५ लाख रुपये दंड या कारवाईमधून वसूल केला जाणार असल्याचे या वेळी महसूल विभागाच्या वतीने मंडल अधिकारी ज्ञानदेव यादव यांनी सांगितले. (वार्ताहर)