शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खेडच्या पूर्व भागात अवैध दारू विक्री जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

दावडी : खेड तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. कारवाई झाली तरी ...

दावडी : खेड तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. कारवाई झाली तरी पुन्हा हा धंदा सुरू होतो. दारू विक्रेत्यांकडून 'मलिदा' मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व निमगावचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

ग्रामीण भागात कोरोना पाय पसरवत असताना दारु विक्रीला जोर आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, कनेरसर, वाफगाव या ठिकाणी अवैध दारु विक्री खुलेआम सुरु आहे. खेड ते दावडी , खेड ते वाफगाव, तसेच खेड ते कनेरसर या रस्त्यालगत ठिकठिकाणी ढाब्यावर अवैधरित्या दारू मिळत आहे. अवैध दारू विक्रेत्यांचे ढाबे रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी तळीरामांची नेहमी गर्दी असते. तळीराम रस्त्यावरच गाडी पार्क करून जात असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. एकीकडे या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह या भागातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तसेच सर्वत्र सोशल डिस्टन्सचे पालन करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु, दुसरीकडे या भागात अवैध दारु विक्रीला जोर आला असून दारुच्या अड्डयावर अनेक तळीराम मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. अवैध दारुचे अड्डे मात्र खुलेआम सुरु आहेत. दारू विक्री करणार्‍यांची दहशत असल्यामुळे तसेच बीट अंमलदाराशी आर्थिक जवळीक असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे रेटवडीचे पोलीस पाटील उत्तम खंडागळे, खरपुडीचे पोलीस पाटील दादाभाऊ निकाळजे यांनी सांगितले.

अवैधरित्या दारू मिळत असल्याने तसेच शाळा व महाविद्यालय बंद असल्याने महाविद्यालयीन युवकांना दारुचे व्यसन लागण्याची शक्यता आहे.

दावडी परिसरात खुलेआमे अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याबाबत वारवांर माहिती देऊनही

कित्येक दिवसापासून सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीविरोधात पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याने दारु विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.

-आत्माराम डुंबरे ,पोलीस पाटील, दावडी