शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

निगुडघर येथे अवैध दारूविक्री

By admin | Updated: May 10, 2017 03:52 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यमार्ग व महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील सर्व दारूविक्री बंद करण्याचा निर्णय झाला असला

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यमार्ग व महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील सर्व दारूविक्री बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी निगुडघर येथे मात्र अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. यामुळे हिर्डोशी खोऱ्यातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.महामार्गावरील आणि राज्यमार्गावरील हॉटेल, ढाबे, बार, बिअर शॉपी, वॉईन शॉप येथील दारूविक्री बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्याने त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र ती काही दिवसच होती. महाड-पंढरपूर हा राज्य मार्ग व सध्याचा राष्ट्रीय मार्गावरील निगुडघर (ता. भोर) येथे बेकायदेशीर अवैध दारूधंदे सुरू आहेत. याचा त्रास गावातील महिलांसह नागरिकांना होत आहे. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करून भोर पोलीस निरीक्षकांना देण्यात आला. मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. महाड-पंढरपूर रस्त्यावर सुमारे १२०० लोकवस्तीचे निगुडघर गाव आहे. गावात रविवारी आठवडा बाजार भरत असल्याने व दवाखान्यामुळे आजूबाजूच्या १५ ते २० गावांतील नागरिक बाजारासाठी व विविध कामांसाठी निगुडघरला येतात. शिवाय महापंढरपूर रस्ता असल्याने सतत वाहनांची व लोकांची गर्दी असल्याने येथील हॉटेलात देशी, विदेशी हातभट्टी दारूची सर्रासपणे बेकायदेशीरपणे विक्री केली जाते. सदरच्या अवैध धंद्यांमुळे गावातील व बाहेरून येणारे नागरिक दारू पिऊन दररोज भांडणतंटे मारीमारी होतात. याचा त्रास गावातील स्थानिकांना सहन करावा लागत आहे.