शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांचे आत्मविकासाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 25, 2015 00:39 IST

सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे

पुणे : सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे आत्मविकासाकडे दुर्लक्ष होत चालल्याचे दिसत आहे असे मत लेखक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.महायोगी श्रीअरविंद विचार मंच आयोजित श्रीअरविंद व्याख्यानमाला आयोजित केली होती त्यावेळी ते निवारा सभागृह या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण दिक्षित, मीरा दीक्षित, डॉ. अंशुमती दुनाखे आदि उपस्थित होते. तसेच याप्रसंगी मीरा दीक्षित लिखित आत्मविश्वास: माताजींच्या सानिध्यातील या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.तर डॉ. अंशुमती दुनाखे यांचे महामानव श्रीअरविंद या विषयावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते.जोशी म्हणाले, आत्मविकास करण्यासाठी मनामध्ये एका प्रकारची मोठी विलक्षण ताकद असते. ते नेहमी प्रसन्न ठेवावे लागते. यासाठी आत्मगूढ तयार करणे आवश्यक असते. तसेच सध्या एकांत व एकाग्रता ही मुल्ये हरवत चालली आहे यासाठी आजच्या काळात महायोगी श्रीअरविंद यांचे तत्वज्ञान महत्वपूर्ण आहे.महायोगी श्रीअरविंद हे विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर यापैकीच एक होते. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते तसेच ते अत्यंत हुशार व विचारशीलदेखील होते. देशासाठी झपाटलेल हे व्यक्तीमहत्व होतं.तसेच देशाचा विकास करायचा असेल तर चळवळ ही जनसामान्यापर्यत पोहोचली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी सशस्त्र क्रांती केली पाहिजे असे त्यांचे विचार होते.अशी माहिती डॉ. अंशुमती दुनाखे यांनी महामानव अरविंद या व्याख्यानमालिकेत दिली.(प्रतिनिधी)