शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आद्यक्र क्रांतिकारकाची उपेक्षा !

By admin | Updated: November 10, 2014 05:07 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्याची होळी करून बलिवेदीवर चढलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडत आलेला आहे

लक्ष्मण मोरे, पुणेदेशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्याची होळी करून बलिवेदीवर चढलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडत आलेला आहे. इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी समाजातील तरुणांना घेऊन सशस्त्र लढा उभारणाऱ्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचे स्मारक पुण्यात कोठे आहे, याचे उत्तर कदाचितच कोणाला माहिती असेल. संगम पुलाजवळील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयाच्या आवारात असलेले हे स्मारक सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. मद्यपींचा अड्डा बनलेल्या या स्मारकाच्या माथीही काळकोठडीचीच शिक्षा आलेली पहायला मिळत आहे.संगम पुलाजवळ सीआयडीचे कार्यालय आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव केला. खटला सुरु असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता. खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० या कालावधीमध्ये फडके या खोलीमध्ये राहिले. जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात करण्यात आली होती. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमध्ये फडकेंचे एखादे स्मारक असावे, अशी कल्पना सीआयडीचे तत्कालीन महासंचालक जयंत उमराणीकर यांनी मांडली. त्यानुसार लोकवर्गणी आणि फडके स्नेहवर्धिनी संस्थेच्या अर्थसाहाय्यामधून २१ फेब्रुवारी २००६ रोजी एक देखणं स्मारक उभं राहिलं. येथे काम करणाऱ्या पोलिसांना प्रेरणा मिळावी, ही वास्तू एका क्रांतिकारकाच्या स्पर्शाने पावन झालेली आहे याची जाणीव कायम राहावी, याकरिता या स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. पोलिसांनाही या स्मारकाचा विसर पडलेला आहे.