शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांचे लोककलाकारांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 24, 2017 03:54 IST

प्रभाताई शिवणेकर म्हणाल्या, ‘‘पुणे महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा केवळ माझा सन्मान नसून लोककलेचा सन्मान आणि तमाशा कलेचा सन्मान आहे

प्रभाताई शिवणेकर म्हणाल्या, ‘‘पुणे महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा केवळ माझा सन्मान नसून लोककलेचा सन्मान आणि तमाशा कलेचा सन्मान आहे. एका तमाशा कलावंतास पठ्ठे बापूराव यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हा जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आहे, असे मला वाटते. मी मूळची बेळगावची. परंतु, लहानपण मुळशी तालुक्यातील बालगुडी परिसरात गेले. नऊ वर्षांची होते त्या वेळी आई-वडील देवाघरी गेले. पुढे बहिणीने माझा सांभाळ केला. लहानपणी गाई-म्हशी वळणे, घरातील कामे करणे, लाकडाच्या मोळ्या वाहने ही कामे केली. बारा वर्षांची असताना दादू इंदुरीकरसह शंकर शिवणेकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. गवळणीत काम करू लागले. तसेच गाणी म्हणने आणि वगातही भूमिका साकारायला सुरुवात झाली. मला आठवतयं पहिला वग ‘लड्डूसिंग’ होता. त्यानंतर ‘मराठी शाहीची बोलकी’, ‘मल्हारराव होळकर’ अशा वगांत कामे करायला सुरुवात केली. त्यात छोट्यामोठ्या भूमिका साकारायला सुरुवात झाली. खरे तर तमाशात काम करण्याचा कोणताही अनुभव नाही. शिक्षण नाही. मला कला क्षेत्रात घडविण्यात दादू इंदुरीकर यांचे योगदान आहे. गाणी कशी म्हणायची, नृत्य कसे करायचे. अभिनय कसा करायचा हे शिकविले. त्यानंतर आलेल्या झाशी च्या राणीमधून झाशीच्या राणीची मुख्य भूमिका केली. त्यातून मला खूप लोकप्रियता मिळाली. तमाशात खूप बदल झाला आहे. कालचा तमाशा आणि आजचा तमाशा खूप वेगळाच आहे. गावात डबडी वाजवून तमाशाची दवंडी दिली जायची. त्यानंतर गावातील मोकळ्या जागेत दगडांचा उंचवटा करून त्यावर माती टाकून त्यावर तमाशा सादर व्हायचा. आजच्या सारखा झगमगाट त्या काळी नव्हता. पूर्वीचा तमाशा वगनाट्य प्रधान होता, आताचा तमाशा संगीत प्रधान आहे. काळ बदलला तशी आवडही बदलली. जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती दादू इंदुरीकराच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून या वगनाट्यात सावळा कुंभाराबरोबरच गंगीचीही भूमिका महत्त्वाची आहे. गंगीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला. या वगनाट्यास मोठी लोकप्रियता मिळाली. प्रभा शिवणेकर आणि गंगी असे समीकरण बनले. या वगनाट्याचे सुमारे वीस वर्षे हजारो प्रयोग केले. त्यातून मनोरंजनाबरोबरच समाजाचे प्रबोधन करण्याचेही काम केले.’’‘‘लोककलांची अवस्था काय आहे, हे आपण सर्वच जण जाणतो आहोत. महाराष्ट्रातील संस्कृतीला एकसंध ठेवण्याचे काम लोककलांनी केले आहे. लोककलांनी महाराष्ट्राचे मनोरंजनच केले नाही, तर दिशा देण्याचे कामही केले आहे. त्यात तमाशा कलेचे योगदान मोलाचे आहे. या कलेची आजची परिस्थिती काय? तमाशाचे फड चालविणेही कठीण झाले आहे. कोणी तमाशात काम करायला तयार होत नाही. तमासगीरांनाही आपली मुलं, तमाशात काम करावी, असे वाटत नाही. त्यामुळे कलांचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता समाज, राजकारणी, शासनाने घ्यायला हवा. संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. कलाकारांना कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये. कोणताही उद्देश न ठेवता कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या कलावंतांची कदर शासनाने करायला हवी. तरच कला आणि कलाकार टिकतील, असेही शिवणेकर म्हणाल्या.