शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत निष्ठावंतांची उपेक्षा

By admin | Updated: December 26, 2016 04:06 IST

राजकीय पक्षांचे वॉर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवपदांवर अनेक कार्यकर्ते निष्ठेने वर्षानुवर्षे काम करीत राहतात, पक्षाकडून कधी

पुणे : राजकीय पक्षांचे वॉर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवपदांवर अनेक कार्यकर्ते निष्ठेने वर्षानुवर्षे काम करीत राहतात, पक्षाकडून कधी तरी किमान निवडणूक लढण्याची संधी मिळेल याची वाट ते पाहत आहेत. मात्र तिकीटवाटपाच्या वेळी अचानक पक्षात आलेल्या बिल्डर, इतर व्यावसायिक किंवा आयात नगरसेवकांना प्राधान्य देऊन कार्यकर्त्याची अवहेलना केली जात आहे. राजकीय पक्षांकडून सामान्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला अशी सातत्याने उपेक्षा येऊ लागल्याने आता निष्ठावान कार्यकर्ते ही जमातच दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. गणेश मंडळाचा पदाधिकारी म्हणून काम पाहता पाहता, तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कधी बनून जातो, हे त्यालाच समजत नाही. आपल्या भागातील ओळखीच्या नेत्याला मदत करण्यासाठी म्हणून तो राजकारणात उतरतो. काही वर्षे पक्षात काम केल्यानंतर त्याला पक्षाकडून वॉर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी पदेही दिली जातात. ही पदे मिळाल्यावर कार्यकर्ता चांगलाच हुरळून जातो. त्याला त्याच्या पक्षाचा चांगलाच अभिमान वाटू लागतो. मोठ्या हिरीरीने तो पक्षसंघटनेच्या कामाला झोकून देतो. मात्र पक्षाकडून उमेदवारी देण्याची वेळ आली, की मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांऐवजी दुसऱ्याच उपऱ्या व्यक्तीला संधी दिली जात असल्याचे चित्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी-अधिक फरकाने दिसून येत आहे. मध्यवस्तीमध्ये एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता, वॉर्ड अध्यक्ष म्हणून गेल्या २५ वर्षांपासून काम करीत असलेला एक पदाधिकारी म्हणाला, ‘‘पक्षाकडून कामाची दखल घेतली जाईल, या भावनेने अनेक वर्षांपासून काम करीत राहिलो. पक्षसंघटना वाढविण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली. आता जेव्हा पक्षाला चांगले दिवस आले तेव्हा अचानक विरोधी पक्षातील विद्यमानाला पक्षात घेण्याची चर्चा ऐकतोय. ज्यांच्या विरोधात पक्ष वाढविला, त्यांचाच हातात आता पक्ष देण्याचे चालले आहे.’’ पक्षासाठी इमानेइतबारे काम करणारे अनेक कार्यकर्ते असतात. मात्र त्यांच्याकडे पक्षनेत्यांचे दुर्लक्षच होते. तो केवळ कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठीच पक्षात आला आहे, अशीच वागणूक मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)