शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 12, 2014 00:01 IST

स्वदेशीचा स्वीकार करून विदेशी कपडय़ांची होळी करून स्वातंत्र्य रणात जाज्वल्य क्रांतिपर्व निर्माण करणा:या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची सध्या दैना झाली आहे.

पुणो : स्वदेशीचा स्वीकार करून विदेशी कपडय़ांची होळी करून स्वातंत्र्य रणात जाज्वल्य क्रांतिपर्व निर्माण करणा:या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची सध्या दैना झाली आहे. ‘माझी समुद्रातील उडी विसरलात तरी चालेल; परंतु माङो सामाजिक कार्य विसरू नका,’ असे भावनिक आवाहन करून देह ठेवलेल्या सावरकरांच्या स्मारकाला सध्या अस्वच्छतेने घेरले आहे.
 
डेक्कन येथील विमलाबाई गरवारे प्रशालेसमोर स्वातंत्र्यवीरांचे हे स्मारक आहे.  ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला’ या त्यांच्याच काव्यपंक्ती मिरवीत उभे असलेले हे स्मारक म्हणजे राष्ट्रभक्ती आणि जाज्वल्य अभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. याच ठिकाणी सावरकरांनी 19क्5मध्ये महाविद्यालयीन मित्र आणि सहका:यांच्या मदतीने विदेशी कपडय़ांची ऐतिहासिक होळी केली होती. या आंदोलनामध्ये त्या वेळी लोकमान्य टिळकांनी सहभाग घेतला होता. तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे भाषण त्या वेळी टिळकांनी केले होते. या विदेशी कपडय़ांच्या होळीमुळे प्रभावित होऊन अनेक तरुण इंग्रजांविरुद्ध पेटून उठले होते.
या ठिकाणी पुणो महापालिकेच्या वतीने एक सुंदर स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते 1क् ऑक्टोबर 2क्क्3 रोजी करण्यात आले होते. या वेळी तत्कालीन खासदार प्रदीप रावत, महापौर दीप्ती चौधरी, आमदार विनायक निम्हण, इतिहासतज्ज्ञ श्रीपती शास्त्री आदी उपस्थित होते. स्मारकाच्या मधोमध विदेशी कपडय़ांच्या होळीचे आकर्षक आणि सुंदर असे म्युरल तयार करण्यात आलेले आहे. तर, आवारामध्ये सावरकरांचा एक अर्धाकृती पुतळाही आहे. परंतु सध्या या स्मारकाला धुळीने माखले आहे. या स्मारकाच्या गेटला कायमच कुलूप घातलेले असल्यामुळे नागरिकांना तेथे जाता येत नाही. 
 
विजेच्या तारा आणि भेंडोळे
4स्मारकाच्या डाव्या बाजूला लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांचीही म्युरल आहेत. या कोप:यामध्ये वायरचे भेंडोळे पडलेले असून, डीपीमधून गेलेल्या या वायर धोकादायक अवस्थेत लटकत आहेत. तसेच, सावरकरांच्या पुतळ्याच्या बाजूला दिवे तुटून खाली पडलेले आहेत. जागोजाग वायर तुटलेल्या असल्यामुळे विजेचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
4स्मारकाच्या देखभालीकरिता रखवालदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे; परंतु रखवालदाराला बसण्यासाठी असलेल्या केबिनमध्ये सिमेंटची पोती आणि अन्य साहित्य ठेवल्यामुळे त्यालाच बसण्यासाठी इतरत्र जागा शोधावी लागत आहे. या केबिनच्या बाजूला आणि पाठीमागे कचरा आणि बांधकामाचे साहित्य पडलेले आहे.