शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्रामधील अपघाताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 13, 2016 02:12 IST

येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे निर्ढावल्याचे चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी पटनी फोमस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र, त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उडालेली तारांबळ पाहता, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कामगार तसेच परिसरात असणाऱ्या कुरकुंभ, पांढरेवाडी तसेच अन्य जवळपास असणाऱ्या नागरिकांचे भविष्य धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.पटनी फोमस या कंपनीमध्ये गाद्यांमध्ये वापरण्यात येणारे फोम बनवले जाते. अगदीच वीसच्या जवळपास कामगार असणारी ही कंपनी सामान्यत: कुठल्याही प्रकारचा धोका न संभवणारी अशी ही कंपनी असल्याचा गैरसमज हा मंगळवारी लागलेल्या आगीमुळे दूर झाला. आग विझविण्यासाठी प्रथम कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, त्याच्या क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या भीषण आगीला विझविण्यासाठी जवळपास ५ अग्निशामक गाड्यांचा वापरदेखील कमी पडत होता. तर, रिकाम्या झालेल्या अग्निशामक गाड्यांमध्ये पाणी मिळविण्यासाठी फायर हायड्रन्ट लाईनदेखील जवळपास नसल्यामुळे अडचणीत आणखी भर पडत गेली.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक पदार्थ उत्पादन करणारे देशातील एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. मोठमोठ्या उद्योगसमूहांचे या ठिकाणी कारखाने आहेत. वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे, वायूचे प्रदूषण येथील ग्रामस्थ सोसत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या स्फोट व आग लागण्याच्या समस्येमुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)