शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमीन संपादनाला गोंधळ असेल तर चौकशी होईलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

रांजणगाव सांडस: शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक ३ साठी शिरूर तालुक्यातील सरदवाडी, करडेघाट परिसरातील जमीन संपादन प्रक्रियेत ...

रांजणगाव सांडस: शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक ३ साठी शिरूर तालुक्यातील सरदवाडी, करडेघाट परिसरातील जमीन संपादन प्रक्रियेत काही त्रुटी व गोंधळ झाला असेल याबाबतची चौकशी करण्याचे आदेश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे. या भागातील जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वाढवून मिळण्याबाबत उच्चाधिकार समितीकडे उद्योग खात्याकडून लवकर प्रस्ताव दाखल केला जाईल, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.

रांजणगाव एमआयडीसीतील टप्पा तीन मधील गावे सरदवाडी, करडे घाट परिसरात २०१७ ला झालेल्या भू-संपादनाबाबत स्थानिकांना विश्वासात घेतले नाही, काही शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून भूसंपादनास संमती असल्याचे दाखवले गेले होते. त्यातच तत्कालीन सत्ताअधिकारी व्यक्तींनी संबंधित बड्या राजकीय वजन असणाऱ्यांच्या जमिनीला जास्त भाव दिला, तर सामान्य शेतकरी असलेल्या शेतकरी यांच्या जमिनीला कमी भाव दिला, अशा स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या भूसंपादनात काही शेतकऱ्यांचा विरोध असून, यांची एमआयडीसीकरिता जमीन देण्याची संमती आहे, त्यांनीही मोबदला वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे.

याबाबत काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर सरदवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानेे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याशी (गुरुवारी) चर्चा केली.

याबाबत आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरूर सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब भोसले, उद्योग खात्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती फरोग मुकादम, भूसंपादन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक गोपीनाथ ठोंबरे, उद्योग सहसचिव किरण जाधव उद्योग खात्याचे विभागीय अधिकारी पुणे, अविनाश हदगल, शिरूरचे प्रांताधिकारी संतोष देशमुख, हवेलीचे प्रांत सचिन बारवकर यावेळी उपस्थित होते.

सरदवाडी उपसरपंच कृष्णा घावटे, नानासाहेब नगर, अनिल कर्डिले, दत्ता सरोदे, बाळासाहेब कर्डिले या स्थानिक शेतकरी शिष्टमंडळांनी बैठकीच्या सुरुवातीला आपल्या मागण्या मांडल्या. जमिनीचा मोबदला देताना शेतकऱ्यांना एक बड्या नेत्यांना अधिक असा दुजाभाव झाला आहे. संबंधित जमिनीचा मुद्रांकशुल्क भरला नाही. त्याची चौकशी करावी अशी मागणी आमदार पवार यांनी केली आहे. रांजणगाव एमआयडीसीतील मोकळे प्लॉट बळकावून वाहनचालकांकडून बेकायदा हप्ता वसूल केले जात असून, याबाबतीत संबंधित वर कारवाई करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

...तर कंपन्यांना विरोध : पवार

स्थानिकांना उद्योग-धंद्यांतून रोजगार मिळून त्यांच्या जीवनात बदल घडणार असतील, तर आमचा एमआयडीसीला विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांना मातीत घालून कंपन्या उभ्या राहणार असतील, तर त्याला विरोध करणार. कारखानदारीतून बेरोजगारीचा प्रश्न सुटून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित मोबदला दिला पाहिजे अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली.

०२ रांजणगाव सांडस

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देताना आमदार अशोक पवार.